Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. period related lower back pain affects about 1 in 10 women how can you reduce this pain read expert advise asp

Lower Back Pain : मासिक पाळीदरम्यान पाठदुखी होते का? करा ‘हे’ सात उपाय; पाठदुखी होईल कमी

Lower Back Pain : मासिक पाळीदरम्यान काही महिलांना पाठीचा खालचा भाग दुखणे अशा समस्याही जाणवतात…

February 18, 2025 21:49 IST
Follow Us
  • lower back Pain
    1/9

    मासिक पाळी खूप वेदनादायक असते. पोट फुगणे, पुरळ येणे, मूड बदलणे व मासिक पाळी येण्याआधीच्या दुखण्यामुळे (क्रॅम्प्समुळे) आपले जीवन कठीण होऊन जाते. त्याचबरोबर या दिवसांत काही महिलांना पाठीचा खालचा भाग दुखणे (Lower Back Pain) अशा समस्याही जाणवतात. मासिक पाळीदरम्यान पाठीचा खालचा भाग का दुखतो याच्या कारणांबद्दल फारशी चर्चा केली जात नाही. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 2/9

    पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, मासिक पाळीदरम्यान पाठीचा खालचा भाग दुखण्याची नेमकी कारणं काय आहेत? नाही… तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी संवाद साधला आणि आपण हे दुखणे कसे कमी करू शकता यावर त्यांनी उपाय सुचवले आहेत.(फोटो सौजन्य : @Freepik)

  • 3/9

    पाठदुखी कशामुळे होते?
    मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र, डॉक्टर गंधाली देवरुखकर यांनी सांगितले की, पीरियडशी संबंधित पाठीचा खालचा भाग दुखण्याचा त्रास १० पैकी एका महिलेला होतो. ४० महिलांना दैनंदिन कामकाजात व्यत्यय येण्याइतकी गंभीर लक्षणेसुद्धा जाणवतात. ही वेदना प्रामुख्याने प्रोस्टॅग्लँडिन, गर्भाशयाच्या आकुंचनाला चालना देणाऱ्या हार्मोन्समुळे ओटीपोटाच्या वेदनेतून बाहेर पडते. त्यामुळे हळूहळू ओटीपोटाच्या स्नायूंमुळे पाठीत वेदना होऊ शकते. डॉक्टरांच्या मते, एंडोमेट्रोसिस, फायब्रॉइड्स, एक्टोपिक गर्भधारणा, पीआयडी व पेल्विक सिस्ट यांसारख्या परिस्थितीमुळेही तीव्र वेदना होऊ शकतात. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 4/9

    त्याचबरोबर द योगा इन्स्टिटयूटचे, संचालक, गुरू व लेखक डॉक्टर हंसाजी योगेंद्र यांनी सांगितले की, प्रोस्टॅग्लँडिनसारख्या संप्रेरकांमध्ये चढ-उतारांमुळे स्नायू आकुंचन पावू शकतात, ज्यामुळे वेदना होतात. तर कधी गर्भाशय आकुंचन पावते; ज्यामुळे पाठीच्या वेदना उदभवू शकता. मासिक पाळीदरम्यान जळजळ वाढण्याबरोबरच, पेल्विक स्नायूंमध्ये तणाव येतो आणि पाठीचा खालचा भागात वेदना होऊ शकतात. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 5/9

    डॉक्टर गंधाली देवरखखर यांनी अशा वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपचार सांगितले आहेत (Lower Back Pain) . त्यामध्ये मालिश, उष्मा थेरपी, व्यायाम, आहारातील बदल, जसे की प्रक्रिया केलेले पदार्थ व साखर कमी करणे या बाबी समाविष्ट असू शकते. तुळस, कॅमोमाइल व आले यांसारख्या हर्बल उपचारांमुळे आराम मिळू शकतो, असेदेखील त्यांनी सांगितले. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 6/9

    नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (NSAID) सामान्यतः डॉक्टरांद्वारे याची शिफारस केली जाते आणि काही स्त्रियांना वेदना व्यवस्थापित करण्यासाठी हार्मोनल बर्थ कंट्रोल उपयुक्त वाटते. पण, नियमित स्ट्रेचिंग व वॉकिंग ब्रेक्स (अधूनमधून चालणे) यांद्वारे त्या अस्वस्थता कमी करू शकतात, असे गंधाली देवरुखकर म्हणाल्या आहेत.ही वेदना कमी होण्यासाठी काही उपाय आहेत का? तर हो… (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 7/9

    मासिक पाळीदरम्यान पाठदुखी कमी होण्यास किंवा टाळण्यास मदत करतील असे काही उपाय डॉक्टर योगेंद्र यांनी सांगितले आहेत ते खालीलप्रमाणे…
    १. स्नायू मजबूत करण्यासाठी आणि त्यांची लवचिकता सुधारण्यासाठी नियमित शारीरिक क्रियाकलाप करा.
    २. तुमच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये ध्यान, दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम, हलकेसे स्नायू ताणणे आदींचा समावेश करा. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 8/9

    ३. तुमच्या योगाभ्यासात भुजंगासन (Bhujangasana), उष्ट्रासन (Ushtrasana), विपरीता करणी (Viparita Karani) व सुप्त वक्रासन (Supta Vakrasana)
    या आसनांचा समावेश केल्याने पाठ मजबूत होते.
    ४. शरीरात पाणी टिकवून ठेवण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी कॅफिन व खारट पदार्थांचे सेवन मर्यादित करा. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 9/9

    ५. एकंदर आरोग्याला बळ देण्यासाठी फळे, भाज्या,ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड यांसारख्या दाहकविरोधी पदार्थांचा समावेश करा.
    ६. ओटीपोटावर आणि पाठीवर अतिरिक्त दाब येऊ नये यासाठी त्या दिवसांमध्ये सैल-फिटिंग कपडे परिधान करण्याचा पर्याय निवडा.
    ७. पाठीवरचा ताण कमी करण्यासाठी बसताना, उभे राहताना व चालताना बसण्याची स्थिती योग्य ठेवा. (फोटो सौजन्य : @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Period related lower back pain affects about 1 in 10 women how can you reduce this pain read expert advise asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.