• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. malaika arora intermittent fasting twist she do it every alternate day but what happens if you fast alternate days read expert advise asp

मलायका अरोरा इंटरमिटंट फास्टिंगला देते ‘हा’ ट्विस्ट; तुमच्यासाठी ‘हे’ फायद्याचे आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…

what is Intermittent Fasting : आपल्यातील अनेक जण एकाच जागेवर बसून तासन् तास काम करत असतात. त्यामुळे वजन वाढणे किंवा आरोग्याच्या आणखीन काही समस्या जाणवू लागतात.

February 19, 2025 21:46 IST
Follow Us
  • what is Intermittent Fasting
    1/9

    आपल्यातील अनेक जण एकाच जागेवर बसून तासन् तास काम करत असतात. त्यामुळे वजन वाढणे किंवा आरोग्याच्या आणखीन काही समस्या जाणवू लागतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अनेक जण जिमचा पर्याय निवडतात किंवा काही जण डाएट फॉलो करतात. याचदरम्यान इंटरमिटंट फास्टिंग हा डाएटसारखाच वजन कमी करण्याच्या उपाय सध्या चर्चेत आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    अलीकडेच मलायका अरोराने ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या फिटनेस आणि आहाराच्या सवयींबद्दल खुलासा केला. त्यादरम्यान तिने हेदेखील सांगितले की, मी इंटरमिटंट फास्टिंग करते; पण एका ट्विस्टसह. म्हणजेच मलायका अरोरा एक दिवस आड करून इंटरमिटंट फास्टिंग करते. तिने या पॅटर्नचे कारण उघडपणे सांगितले नसले तरीही इंटरमिटंट फास्टिंग केल्याने शरीरावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी संवाद साधला. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    प्रथम इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय ते जाणून घेऊ…
    इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे ठरावीक वेळेत घेतला जाणारा आहार. डाएटिंगच्या या पद्धतीत दिवसातील २४ तासांपैकी १६ तास उपवास केला जातो. उर्वरित आठ तासांच्या कालावधीत तुम्ही अन्नपदार्थांचे सेवन करू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    तर द्वारका येथील मणिपाल हॉस्पिटलच्या सल्लागार, पोषण व आहारशास्त्रज्ञ डॉक्टर वैशाली वर्मा यांनी सांगितले की, इंटरमिटंट फास्टिंग (IF) ही खाण्याची पद्धत आपण उपवासाच्या कालावधीत काय खातो यादरम्यानचे चक्र आहे. तुम्ही जे खाता, त्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या पारंपरिक आहाराच्या विपरीत इंटरमिटंट फास्टिंग तुम्ही कधी खाता यावर जास्त लक्ष केंद्रित करते. उपवासाच्या काळात तुमच्या शरीराचा फॅट्स कमी करण्याकडे कल असतो. त्यामुळे तुम्ही कोणते पदार्थ खाऊ शकता यावर निर्बंध ठेवणे हा विशिष्ट आहार नाही, तर तुम्ही खाण्याच्या वेळेचे वेळापत्रक कसे ठरवता हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    त्यामुळे इंटरमिटंट फास्टिंग योग्य रीतीने पाळल्यास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण- त्यामुळे वजन कमी होते, रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारते, जळजळ कमी होते व मेंदूचे कार्य सुधारते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/9

    इंटरमिटंट फास्टिंग केल्यास काय होईल?
    गुरुग्राम येथील पारस हेल्थचे इंटरनल मेडिसिन, एचओडी डॉक्टर आर. आर. दत्ता म्हणाले की, अधूनमधून इंटरमिटंट फास्टिंग काळजीपूर्वक केल्यास, सुधारित इन्सुलिन संवेदनशीलता, चांगले चयापचय कार्य आणि ऑटोफॅजीसारख्या एन्हान्स सेल्युलर दुरुस्ती प्रक्रियेससह (enhanced cellular repair processes) अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात, जे खराब झालेल्या पेशी शरीरातून काढून टाकण्याससुद्धा मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    जळजळ कमी करण्यास आणि संपूर्ण हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यास, तर वजन व्यवस्थापन करण्यातसुद्धा मदत करू शकते, असे डॉक्टर आर. आर. दत्ता म्हणाले. ज्यांना दररोज डाएट करायला आवडत नाही, त्यांच्यासाठी हे थोडे अधिक सोईचे ठरू शकते. या गोष्टी शरीराच्या मागणीवर अवलंबून असू शकतात, ज्यामुळे तुमचा आहार आणि उपवासाचे वेळापत्रक व्यवस्थापित करण्यात मदत होऊ शकते, असे डॉक्टर आर. आर. दत्ता म्हणाले आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    पण, उपवास आव्हानांशिवाय कधीच पूर्ण होत नाही. उपवासामुळे थकवा, चिडचिड, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, संतुलित, पोषक घटकांनी युक्त आहार न घेतल्यास संभाव्य पोषक कमतरता तुमच्यात जाणवू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 9/9

    त्याशिवाय आरोग्य स्थिती ठीक नसलेल्या व्यक्ती, काही औषधे घेत असलेल्या व्यक्ती, गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रिया आणि ज्यांना खाण्याच्या पद्धतींचा विकार आहे आहे त्यांनी विशेषतः सावध असले पाहिजे, असे डॉक्टर आर. आर. दत्ता म्हणाले आहेत. त्यामुळे इंटरमिटंट फास्टिंग सुरू करण्यापूर्वी नेहमी आरोग्य सेवा प्रदात्याचा सल्ला घ्या; जेणेकरून तुम्हाला आरोग्याच्या समस्या जाणवणार नाहीत. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Malaika arora intermittent fasting twist she do it every alternate day but what happens if you fast alternate days read expert advise asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.