• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. health tips healthy to take a nap in the afternoon know from expert pdb

दुपारी जेवण झालं की तुम्हालाही झोप येते? डुलकी घेणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट? वामकुक्षीबाबत तज्ज्ञ सांगतात, “दुपारी झोपल्याने…”

Health Tips: दुपारच्या जेवणानंतरची झोप म्हणजे अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो, पण का खरचं दुपारी जेवणानंतर झोपणे तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या…

May 22, 2025 13:57 IST
Follow Us
  • झोप आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पुरेशी झोप घेतल्यास अनेक फायदे मिळतात. झोप तुमच्या दैनंदिन दिनक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.
    1/15

    झोप आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पुरेशी झोप घेतल्यास अनेक फायदे मिळतात. झोप तुमच्या दैनंदिन दिनक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.

  • 2/15

    आपण नेहमी ऐकतो की, आठ तासांची झोप आवश्यक आहे. एखाद्या वेळेस अपुरी झोप झाल्यास दुसऱ्या दिवशी आपले वागणे, काम यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो हे आपल्याला माहीत आहे.

  • 3/15

    सतत अपुरी झोप मिळत राहिल्यास आपल्या मानसिक स्थितीवरही त्याचा परिणाम होत असतो. पण, दुपारच्या वेळी झोप घेणे आरोग्यासाठी वाईट आहे का?

  • 4/15

    गुरुग्राम येथील आर्टेमिस हॉस्पिटलमधील न्यूरो इंटरव्हेंशनल सर्जरीचे प्रमुख डॉ. विपुल गुप्ता यांनी दुपारी झोपणं आरोग्यासाठी चांगले की वाईट? याबाबत माहिती दिल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. यासंबंधी सविस्तर जाणून घेऊ..

  • 5/15

    अनेक अभ्यासांनुसार, दुपारी झोप घेणे तुमच्या मेंदूसाठी चांगले असू शकते; परंतु कालावधी महत्त्वाचा आहे.

  • 6/15

    ‘जर्नल ऑफ द अमेरिकन जेरियाट्रिक्स सोसायटी’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, वृद्ध प्रौढांसाठी दुपारची ३० ते ९० मिनिटांची झोप मेंदूला फायदेशीर असल्याचे दिसून येते. परंतु, एक तासापेक्षा जास्त वेळ झोपल्याने आकलनशक्तीत समस्या निर्माण होऊ शकतात.

  • 7/15

    दुपारी झोपल्याने तणावापासून आराम मिळतो. थोडा वेळ झोपल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. डोळ्यांवरील ताण कमी होतो. मूड फ्रेश होतो. तुमची स्मरणशक्तीही सुधारते.

  • 8/15

    तथापि, दुपारी झोपण्याचे अनेक फायदे असले तरीही याचे काही तोटेही आहेत. दुपारी झोपल्यामुळे आपल्याला कफ, शिंका येणे व अंगात आळस भरणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून दुपारी झोपणे शक्यतो टाळावे, असे आयुर्वेदात आवर्जून सांगितले जाते.

  • 9/15

    एखादी व्यक्ती एक ते दोन तास झोपत असेल, तर त्याच्या रात्रीच्या झोपेत दोष निर्माण होतात. एक तर ती गरजेपेक्षा कमी काळ असते किंवा त्या व्यक्तीला झोपेसंदर्भात काही आजार असू शकतात.

  • 10/15

    दिवसा झोपल्याने आणि रात्री जागरण केल्याने रक्तदाब, हृदयविकार व मधुमेहाचा धोका वाढू शकतो. तथापि, तज्ज्ञ इशारा देतात की, दिवसभरात जास्त वेळ झोपल्याने गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

  • 11/15

    डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले, “झोप घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दुपारी. १५ ते २० मिनिटे झोप घ्यावी. कारण- जर संध्याकाळी डुलकी घेतली, तर तुमच्या रात्रीच्या झोपेच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो.”

  • 12/15

    वारंवार अधिक वेळ डुलकी घेतल्याने हानीकारक आणि दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो; पण तुम्ही खूपच थकलेले असाल, तर अर्धा ते एक तास झोप घ्यायला हरकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • 13/15

    जेवल्यानंतर लगेच झोपल्याने लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल व पचन आणि जीवनशैलीशी संबंधित इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे असे करणे टाळावे.

  • 14/15

    दुपारी थोडा वेळ झोप घेतली जाऊ शकते. हे लहान मुले, वृद्ध आणि भरपूर काम करणाऱ्या लोकांसाठी योग्य ठरेल. 

  • 15/15

    (फोटो सौजन्य : Pexels\Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Health tips healthy to take a nap in the afternoon know from expert pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.