-
उपवास करणं म्हणजे पोटाला, पंचनसंस्थेला छोटासा ब्रेक देणं. मात्र, ही विश्रांती देत असताना फिटनेसकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उपवासाच्या दिवशी देखील स्ट्रेचिंग, योगासनांचे सोपे प्रकार व काही हलके व्यायामाचे प्रकार करायला हवेत जेणेकरून आपण दिवसभर उत्साही राहू शकतो. आत्ता नवरात्रोत्सव चालू आहे. या दिवसांमध्ये अनेकजण उपवास करतात. त्याचबरोबर व्यायामशाळेत जाणं, योगा करणं टाळतात. परंतु, आज आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या व्यायामाच्या प्रकारांची माहिती देणार आहोत जे तुम्ही उपवासाच्या दिवशी सुद्धा करू शकाल आणि दिवसभर उत्साही राहाल. (Photo Source : unsplash)
-
बॉडीवेट स्क्वॉट्स : स्क्वॉट्स (उठाबशा) हे कंबर व पायांची ताकद वाढवण्यास मदत करतात. कमरेपासून तळपायापर्यंत रक्तप्रवाह सुधारतात. यामध्ये कुठलंही जड वजन उचलण्याची गरज पडत नाही. त्यामुळे उपवासाच्या दिवशी देखील स्क्वॉट्सचे तीन सेट्स (प्रत्येकी १० रीपिटेशन्स) पूर्ण करायला हवेत. (Photo Source : unsplash)
-
बसून केले जाणारे श्वसनाचे व्यायम/प्राणायाम : प्राणायाम करणे योगाभ्यास करण्याइतकंच उत्तम मानलं जातं. उपवासाच्या दिवशी अनुलोम-विलोम करा, जेणेकरून तुमची श्वसनप्रक्रिया सुधारेल. तुमची ऊर्जेची पातळी टिकून राहील. (Photo Source : unsplash)
-
सूर्यनमस्कार : हा ऊर्जा देणारा व्यायामाचा प्रकार आहे जो पचन सुधारतो, आपली गतिशीलता वाढवतो, आणि शरीराचा पूर्ण ताण न घेता हा व्यायामाचा प्रकार करता येतो. (Photo Source : unsplash)
-
वॉल पुशअप्स : जमिनीवर पुशअप्स मारण्यासाठी म्हणजेच दंडबैठकांसाठी खूप ताकद लागते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी हा व्यायाम न केलेलाच बरा. परंतु, तुम्ही वॉल पुशअप्सचे तीन सेट्स नक्कीच मारू शकता. जे खांदे व बायसेप्स मजबूत करण्यास मदत करतात. परंतु, यातही थकवा जाणवतो. त्यामुळे दोन सेट्स केले तरी पुरे. (Photo Source : unsplash)
-
लाइट डान्स कार्डिओ : गरबा खेळण्यासाठी किंवा फ्रीस्टाइल डान्स करण्यासाठी खूप ऊर्जा लागते. ती ऊर्जा मिळवण्यासाठी लाइट डान्स कार्डिओ केल्यास रात्री गरबा खेळताना थकवा येत नाही. (Photo Source : unsplash)
-
योगा : काही सोपी योगासने करून आणि त्याबरोबर स्ट्रेचिंग करून तुम्ही शरिराची लवचिकता सुधारू शकता. यामुळे गरबा खेळताना हव्या त्या डान्स स्टेप्स करणं सोपं जातं. (Photo Source : unsplash)
उपवास केल्यानंतरही न थकता गरबा खेळायचाय? मग व्यायामाचे ‘हे’ सहा सोपे प्रकार ठरतील फायदेशीर
नवरात्रीपासून सणासुदीचा काळ सुरू झाला आहे आणि तुम्हाला ऊर्जा न गमावता धावत राहण्यासाठी, उपवास करताना ऊर्जा आणि ताकद मिळवण्यासाठी नवरात्रीत तुम्ही करू शकता असे सहा प्रकारचे छोटे व्यायाम येथे आहेत.
Web Title: 6 short workouts you can do during navratri for energy and strength while fasting 10263012 iehd import