Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra political leaders on controversial statement of bhagat singh koshyari dpj

Photos : ठाकरे बंधू ते देवेंद्र फडणवीस, राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर कोण काय म्हणाले? वाचा…

गुजराती व राजस्थानी लोकांनी पैसे काढून घेतले तर मुंबईत पैसेच शिल्लक राहणार नाही आणि देशाची आर्थिक राजधानीही राहणार नाही, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेनेसह काँग्रेस पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Updated: July 30, 2022 18:54 IST
Follow Us
  • उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून वातावरण गढूळ करु नका. तुम्ही हे का बोलताय हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका इतकंच आपल्याता आत्ता सांगतो, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारींना इशारा दिला आहे.
    1/22

    उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून वातावरण गढूळ करु नका. तुम्ही हे का बोलताय हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका इतकंच आपल्याता आत्ता सांगतो, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारींना इशारा दिला आहे.

  • 2/22

    महाराष्ट्रच्या जडणघडणीत मराठी माणसापेक्षा मराठी उद्योजक, मराठी साहित्यक, विविध क्षेत्रातील मराठी लोक यांचा सहभाग हा सर्वात जास्त आहे.” राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. असं उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

  • 3/22

    राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. आम्ही राज्यपालांशी असहमत आहोत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका.

  • 4/22

    भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या दोन-अडीच वर्षांच्या काळात सुंदर लेण्या, शिवरायांचे गड-किल्ले व इतर सर्व चांगल्या गोष्टी पाहिल्या असतील. मात्र, आता त्यांना कोल्हापूरचा जोडा दाखवण्याची देखील वेळ आली असल्याचे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा राज्यपालांवर निशाणा.

  • 5/22

    कोश्यारी यांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांचे अंत:करण यात काहीही फरक नाही. अशा प्रकारची विधाने करणे हे शहाणपणाचे लक्षण नसल्याची टीका शरद पवारांनी राज्यपालांवर केली आहे

  • 6/22

    ‘महाराष्ट्राचा घोर अपमान! ५० खोकेवाले कोणत्या झाडी डोंगरात लपलेत’; राज्यपालांविरोधात संजय राऊत आक्रमक

  • 7/22

    राज्यपालांविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकरांकडून स्पष्ट

  • 8/22

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसांच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिली.

  • 9/22

    महाराष्ट्राचा अपमान करण्याची पुन्हा हिंमत करू नका; किशोरी पेडणेकर यांचा राज्यपालांना इशारा

  • 10/22

    राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या पदाची प्रतिमा धुळीस मिळवण्याचा चंग बांधलेला दिसू येत आहे. महाराष्ट्राची बदनामी थांबवा आणि माफी मागा. नाहीतर मोठे आंदोलन करु, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंचा राज्यपालांना इशार

  • 11/22

    महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचे, मराठी माणसांचे राज्य आहे. ज्या दिवशी शिवाजी महाराजांचे मावळे रस्त्यावर उतरतील त्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सळो की पळो करून सोडतील, असा इशारा काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी दिला.

  • 12/22

    महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा राज्यपालांचा कट असून त्यांना या पदावरून हटवण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

  • 13/22

    वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. राज्यपालांच्या विधानामुळे महाराष्ट्राचा अपमान झालेला नाही. त्यांनी केलेले वक्तव्य योग्य असून मी त्याचे समर्थन करतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

  • 14/22

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही, भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून पाठराखण

  • 15/22

    महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत माहिती नसेल तर राज्यपालांनी नको त्या गोष्टीत आपलं नाक खुपसू नये. राज्यपाल म्हणून आम्ही तुमचा, तुमच्या पदाचा आदर करतो. गुण्यागोविंदानं त्यांनी महाराष्ट्रात रहावं अन्यथा त्यांना मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिला आहे.

  • 16/22

    राज्यपालांना महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या इतिहासबाबत माहिती नसल्याने त्यांची मराठी माणसावर व्यक्त होण्याची लायकी नाही. त्यामुळे राज्यपालांना माघारी पाठवण्याची नाही तर सरळ हकलवुन लावण्याची वेळ आली असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली.

  • 17/22

    महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

  • 18/22

    ‘राज्यपाल हटाओ… महाराष्ट्र बचाओ’ कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

  • 19/22

    गुजराती, राजस्थानी हा विषय राहू द्या, सर्वात आधी यांनाच नारळ दिला पाहिजे”, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी कोश्यारींना लगावला आहे.

  • 20/22

    “महाराष्ट्राचे राज्यपाल एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व”. आमदार रवी राणांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन

  • 21/22

    विरोधकांकडे बोलण्यासाठी दुसरा विषय राहिलेला नाही. त्यामुळे अशा मुद्द्यांवर ते बोलत आहेत. २७ सेकंदांमध्ये ७० शिव्या देणारे सर्वज्ञानी कोणाला दिसत नाहीत. त्यांच्यावर बोलण्यासाठी कोणाची जीभ रेटत नाही. पण राज्यपाल जे बोलले त्याचा कसा विपर्यास करायचा यावर सगळ्याची जीभ रेटते हे बघायला मिळत असल्याचा टोला भाजापाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधकांना लगावला आहे.

  • 22/22

    कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे तसेच या पदावर महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, अशी मागणी संभाजी छत्रपती यांनी केली आहे.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisभगतसिंह कोश्यारीBhagatsingh Koshyariराज ठाकरेRaj Thackerayसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Maharashtra political leaders on controversial statement of bhagat singh koshyari dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.