• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • पावसाळी अधिवेशन
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. chhagan bhujbal vs devendra fadnavis on gst during 2nd day of maharashtra assembly monsoon session 2022 scsg

भुजबळ Vs फडणवीस : भुजबळ म्हणाले, ‘एवढे चमचे असताना…’; फडणवीस उत्तर देताना उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “महाराष्ट्र म्हणजे…”

दोन्ही नेत्यांनी एकमेकांना सभागृहामध्ये शाब्दिक चिमटे काढत जीएसटीच्या मुद्द्यावरुन सुनावलं

Updated: August 18, 2022 21:22 IST
Follow Us
  • chhagan bhujbal vs devendra fadnavis on gst during 2nd day of maharashtra assembly monsoon session 2022
    1/35

    विधासनभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाजादरम्यान जीएसटीसंदर्भातलं विधेयक चर्चेसाठी मांडण्यात आलं. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी तुफान फटकेबाजी करत शिंदे सरकारला धारेवर धरलं.

  • 2/35

    जीएसटीवरील या चर्चेदरम्यान छगन भुजबळ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधील शाब्दिक कलगीतुरा सभागृहामध्ये पहायला मिळाला.

  • 3/35

    मात्र त्यानंतर भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसं उत्तर छगन भुजबळ यांना दिलं.

  • 4/35

    विशेष म्हणजे जीएसटीच्या दरांमध्ये वाढ करण्यासंदर्भातील समितीबद्दल बोलताना फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला.

  • 5/35

    राज्यातील महाविकास आघाडी सरकारसाठी देवेंद्र फडणवीस यांनी अगदीच वेगळी उपमा आपल्या भाषणात दिली.

  • 6/35

    देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सत्तेत असलेल्या सरकारचा केलेला उल्लेख ऐकून सत्ताधारी पक्षातील सर्वच सदस्य हसू लागले.

  • 7/35

    भुजबळ यांनी अनेक जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्यावरून केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र आक्षेप घेतला.

  • 8/35

    “आपण सगळ्यांनी सांगितलं की जीएसटीचं संकलन वाढलं आहे. आत्तापर्यंत अन्नधान्यासहित अनेक जीवनावश्यक वस्तू करमुक्त होत्या,” असं म्हणत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.

  • 9/35

    “नव्या निर्णयामुळे पॅकिंग अन्नदान्य, पीठ, रवा, मैदा, दुग्धजन्य पदार्थ अशा अनेक जीवनावश्यक गोष्टींवर ५ टक्के जीएसटी लागू होत आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेलाच बसणार आहे,” असंही भुजबळ म्हणाले.

  • 10/35

    “तुम्ही कोणत्याही मार्गाने जेव्हा एखादा कर वाढवता, तेव्हा त्याचा फटका शेवटच्या माणसाला बसतो”, असं छगन भुजबळ म्हणाले.

  • जीएसटीसंदर्भातील आपला मुद्दा मांडण्यापूर्वी छगन भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या एका टिप्पणीमुळे सभागृहात चांगलाच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
  • 11/35

    समोर बसलेल्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून बोलताना छगन भुजबळांनी त्यांच्या दाढीवर मिश्किल टिप्पणी केली.

  • 12/35

    “समोर मुख्यमंत्री बसले आहेत. मला मुख्यमंत्र्यांकडे बघून खूप आनंद झाला आहे. पण तुम्ही मुख्यमंत्री झालात यासोबतच मला आनंद वेगळाच आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले. पण त्यातही सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे,” असं भुजबळ अगदी स्वत:च्या दाढीला हात लावत म्हणाले.

  • 13/35

    “काळ्या दाढीचा प्रभाव फक्त महाराष्ट्रात आहे. सफेद दाढीचा प्रभाव दिल्लीपासून भारतभर आहे”, असं भुजबळ म्हणताच सभागृहातील इतर सदस्यांनी त्याला हसून दाद दिली.

  • 14/35

    भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपलं दिल्लीतील वजन वापरुन जीएसटी कमी करण्यासंदर्भातील मागणी केंद्राकडे करावी असंही भुजबळ म्हणाले.

  • 15/35

    तुमच्या दोघांकडे महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. तुम्ही सर्वांना या जीएसटीच्या त्रासातून सोडवावं, असंही भुजबळ म्हणाले.

  • 16/35

    भुजबळ बोलत असताना मागून कोणीतरी परदेशामध्येही महाराष्ट्रातील संत्तांतरणाची दखल घेतली होती या संदर्भाने परदेशातूनही या दोघांवर लक्ष असल्याचं विधान केलं.

  • 17/35

    त्यावर भुजबळ यांनी हो परदेशातूनही लक्ष आहे असं म्हणत या विषयावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं असंही म्हटलं.

  • 18/35

    आता केवळ भाषणावर जीएसटी लावायचं बाकी आहे, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला.

  • 19/35

    एक मिनिटं भाषण दिला की द्या इतका जीएसटी असं होण्याचीही शक्यता आहे, असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला.

  • 20/35

    यावेळी छगन भुजबळांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील शाब्दिक चिमटा काढला.

  • 21/35

    “तुम्ही तिकडे जे मंजूर झालंय, ते इथे मंजूर करून घेत आहात. पण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची महागाईबाबतची ही भावना तिकडे त्यांना तुम्ही सांगा. सगळ्या ठिकाणी भाववाढ सुरू आहे,” असंही भुजबळ म्हणाले.

  • 22/35

    “शाळेतल्या पेन्सिल, खोडरबरवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयाच्या पाच हजारांवरच्या बिलावर जीएसटी लावला आहे. शाळेला चाललो आम्ही जीएसटी सहीत,” असा टोलाही भुजबळ यांनी लगावला.

  • 23/35

    “आपल्या उपमुख्यमंत्र्यांचा दरारा तर दिल्लीमध्ये खूपच वाढला आहे. मोठ्या कमिटीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी जीएसटीसंदर्भातलं महाराष्ट्राचं हे म्हणणं दिल्लीत सांगितलं पाहिजे”, असं भुजबळ यावेळी म्हणाले.

  • 24/35

    “असं म्हणतात की देशात आर्थिक मंदी नाही. मग एवढ्या गोष्टींवर जीएसटी लावण्याची गरज काय?” असा प्रश्नही भुजबळ यांनी विचारला.

  • 25/35

    तसेच भुजबळ यांनी जीएसटी लावण्यात आलेल्या गोष्टींची यादीही सभागृहात वाचून दाखवली.

  • 26/35

    “टेट्रा पॅक, एलईडी दिवे, शाई, चाकू, ब्लेड, पेन्सिल, शार्पनर, चमचे, काटे चमचे, एवढे चमचे असताना त्यांच्यावर सुद्धा तुम्ही टॅक्स लावला,” असा टोला यादी वाचताना भुजबळ यांनी लगावला.

  • 27/35

    यावेळेस भुजबळ यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वकर यांचेही आभार मानले.

  • 28/35

    नेहमी हात वर करुन करुन हात दुखतो पण आज तुम्ही बोलायला संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे असं म्हणत भुजबळ यांनी आपलं भाषण संपवलं.

  • 29/35

    भुजबळ यांच्या या टोलेबाजीनंतर त्यांनी घेतलेल्या आक्षेपाला फडणवीसांनी उत्तर दिलं. शाब्दिक चिमट्याचं उत्तर फडणवीसांनाही शाब्दिक चिमटा काढूनच दिलं.

  • 30/35

    जीएसटीच्या दरवाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी एक फिटमेंट कमिटी तयार करण्यात आलेली असं सांगताना फडणवीस यांनी या कमिटीमध्ये कोणकोणती राज्यं होती हे वाचून दाखवलं.

  • 31/35

    “राजस्थान म्हणजे काँग्रेसचं राज्य. पश्चिम बंगाल म्हणजे ममता बॅनर्जींचं राज्य. तमिळनाडू म्हणजे डीएमकेचं राज्य. बिहार म्हणजे नितीश कुमारांचं राज्य. उत्तर प्रदेश म्हणजे भाजपाचं राज्य. कर्नाटक भाजपाचं राज्य,” अशी यादी फडणवीस यांनी वाचून दाखवली.

  • 32/35

    मात्र या यादीमधील शेवटचं महाराष्ट्राचं नाव घेताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला.

  • 33/35

    “महाराष्ट्र म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृ्त्वामधील अजितदादांचं राज्य,” असं फडणवीस म्हणाले आणि सभागृहामध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर फडणवीसही बोलताना थांबले आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसून आलं.

  • 34/35

    “या फिटमेंट कमिटीने हा निर्णय घेतला. जीएसटी दरवाढीसंदर्भात काही गैरसमज आहेत. जसं पहिल्यांदा अन्नपदार्थांवर जीएसटी लावण्यात आला आहे, हा गैरसमज आहे. व्हॅट पद्धतीमध्येही होतं. तेव्हा राज्यांना अधिकार होता,” असं फडणवीस म्हणाले.

TOPICS
छगन भुजबळ
Chhagan Bhujbal
जीएसटी
GST
देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis
भारतीय जनता पार्टी
BJP
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
NCP
+ 1 More

Web Title: Chhagan bhujbal vs devendra fadnavis on gst during 2nd day of maharashtra assembly monsoon session 2022 scsg

IndianExpress
  • US Senate narrowly passes Trump’s ‘big, beautiful’ tax bill
  • Kolkata law college rape case: Police get a week’s custody, say ‘all the evidence confirms woman’s statement’
  • Ahmedabad air crash: Around 15 human remains found from crash site, consent forms to decide fate
  • Before Telangana factory blast that killed 36, suspected malfunctions and red flags
  • Digital scam Part 2: Opening balance barely Rs 500; Rs 3.72 crore in, Rs 3.33 crore out, all in a day — no one noticed
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.