• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • एकनाथ शिंदे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. important 15 statements of shivsena party chief uddhav thackeray in mumbai pbs

Photos : शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदल, दसरा मेळावा कुठे होणार ते आझादांचे राहुल गांधींवरील आरोप, उद्धव ठाकरेंची १५ महत्त्वाची वक्तव्यं

उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदूत्व, दसरा मेळावा, बंडखोर एकनाथ शिंदे गट, राहुल गांधी, काँग्रेस आणि गुलाम नबी आझाद यांच्यावरही भाष्य केलं. यातील प्रमुख १५ मुद्दे खालीलप्रमाणे…

Updated: August 30, 2022 03:44 IST
Follow Us
  • काँग्रेसचे माजी आमदार संतोष टर्फे यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (२९ ऑगस्ट) उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
    1/18

    काँग्रेसचे माजी आमदार संतोष टर्फे यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (२९ ऑगस्ट) उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

  • 2/18

    यावेळी उद्धव ठाकरे यांनी या पक्षप्रवेशावर भाष्य केलं आणि पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तर दिलं.

  • 3/18

    या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदूत्व, दसरा मेळावा, बंडखोर एकनाथ शिंदे गट, राहुल गांधी, काँग्रेस आणि गुलाम नबी आझाद यांच्यावरही भाष्य केलं. यातील प्रमुख १५ मुद्दे खालीलप्रमाणे…

  • 4/18

    १. दोन दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडने युती केली. आज संघ परिवारातील लोक शिवसेना परिवारात आले आहेत – उद्धव ठाकरे

  • 5/18

    २. मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो आणि आश्चर्यदेखील वाटतं. सर्वसामान्यपणे सत्ताधारी पक्षांकडे पक्षप्रवेशासाठी रांग लागते. मात्र, आज प्रथमच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसत आहे – उद्धव ठाकरे

  • 6/18

    ३. महाराष्ट्राची माती मर्दांना जन्म देते, गद्दारांना जन्म देत नाही. याची प्रचिती दाखवत ही मंडळी शिवसेनेत येत आहे – उद्धव ठाकरे

  • 7/18

    ४. भाजपाने आम्ही हिंदुत्व सोडल्याची आवई उठवली होती. त्याला छेद देणाऱ्या या पक्षप्रवेशाच्या घटना आहे – उद्धव ठाकरे

  • 8/18

    ५. बहुजन, वंचितांसह मुस्लीम बांधवदेखील शिवेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत – उद्धव ठाकरे

  • 9/18

    ६. राज्यात एक वेगळं चित्र निर्माण होत आहे आणि हे चित्र देशासाठी मार्गदर्शक ठरेल – उद्धव ठाकरे

  • 10/18

    ७. ज्यांना हिंदूत्वाच्या भ्रामक कल्पनेत आपण फसले गेलो आहोत असं वाटतं त्यांना मातोश्रीचे म्हणजे शिवसेनेचे दरवाजे उघडे आहेत – उद्धव ठाकरे

  • 11/18

    ८. कोणताही संभ्रम नाही. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा म्हणजे आमचाच दसरा मेळावा होणार आहे – उद्धव ठाकरे

  • 12/18

    ९. दसरा मेळाव्याविषयी संभ्रम निर्माण करणाऱ्यांना संभ्रम निर्माण करू द्या. शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसऱ्याला शिवतीर्थावर येण्याची तयारी सुरू केलेली आहे – उद्धव ठाकरे

  • 13/18

    १०. मुंबई महानगरपालिकेकडून येणाऱ्या परवानगीचा जो तांत्रिक मुद्दा असेल तो त्यांचा ते पाहतील. मात्र, शिवसेनेचा मेळावा दसऱ्याला शिवतीर्थावरच होणार आहे – उद्धव ठाकरे

  • 14/18

    ११. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्ष सोडताना राहुल गांधींवर जे आरोप केले तसंच मी पण भोगतो आहे – उद्धव ठाकरे

  • 15/18

    १२. इकडे आनंदी आनंद आहे आणि आनंदाचा कंटाळा आला म्हणून मी घर सोडतो आहे असं कुणीही कधी बोलत नाही. आमच्याकडेही तेच झालं – उद्धव ठाकरे

  • 16/18

    १३. गद्दारांना नेमकी गद्दारी कशासाठी केली हा प्रश्न पडलाय. काल काय बोललो, आज काय बोलतोय, उद्या काय बोलायचं असे प्रश्न त्यांना पडत आहेत. हे होत असतं, राजकारणात हे नवीन नाही – उद्धव ठाकरे

  • 17/18

    १४. शिवसैनिक आणि शिवसेना आहे तिथं ठाम आहे. शिवसेना रस्त्यावर पडलेली वस्तू नाही की, कुणीही उचलावी आणि खिशात टाकावी – उद्धव ठाकरे

  • 18/18

    १५. शिवसेनेला ५६ वर्षे झालीत. असे ५६ लोकं आम्ही पाहिले आहेत. शिवसेना निष्ठावंतांच्या रक्तावर मोठी होणारी सेना आहे, गद्दारांच्या मेहनतीवर नाही – उद्धव ठाकरे

TOPICS
आरएसएसRSSउद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeकाँग्रेसCongressभारतीय जनता पार्टीBJPराहुल गांधीRahul GandhiशिवसेनाShiv Sena

Web Title: Important 15 statements of shivsena party chief uddhav thackeray in mumbai pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.