• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos finally kharge vs tharoor fight for the post of congress president msr

PHOTOS : नाट्यमय घडामोडींनतर अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगे विरुद्ध थरूर यांच्यात लढत

काल दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

October 1, 2022 17:09 IST
Follow Us
  • नाटय़मय घडामोडींनतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी अखेर मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे.
    1/26

    नाटय़मय घडामोडींनतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी अखेर मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे.

  • 2/26

    शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हे स्पष्ट झाले.

  • 3/26

    ‘तटस्थ’ सोनिया गांधी यांनी खरगे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवल्यामुळे 

  • 4/26

    ‘जी-२३’ या बंडखोर गटातील नेत्यांनीही पसंती दिल्यामुळे खरगे हेच नवे पक्षाध्यक्ष होण्याची शक्यता असून निवडणूक ही केवळ औपचारिकता उरली असल्याचे मानले जाते.

  • 5/26

    राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माघार घेतल्यानंतर, गुरुवारी रात्री संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि ए. के. अ‍ॅण्टनी यांनी सोनिया गांधी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. 

  • 6/26

    त्यानंतर खरगे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

  • 7/26

    खरगेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याआधी दिग्विजय सिंह यांनी खरगेंची भेट घेतली होती; पण आपण पक्षाध्यक्षपदासाठी उत्सुक नसल्याचे खरगेंनी सांगितले होते. 

  • 8/26

    सोनिया गांधी यांनीच खरगेंच्या नावाला पाठिंबा दिल्यामुळे खरगे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास तयार झाले.

  • 9/26

    त्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा दिग्विजय सिंह यांनी खरगेंची भेट घेतली आणि उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय जाहीर केला. 

  • 10/26

    खरगे वरिष्ठ नेते असल्याने त्यांच्या विरोधात निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे दिग्विजय सिंह यांनी पत्रकारांना सांगितले. 

  • 11/26

    खरगेंच्या ३० अनुमोदकांपैकी दिग्विजय सिंह हेही एक अनुमोदक आहेत.

  • 12/26

    विशेष म्हणजे दिग्विजय सिंह यांनी पक्ष कार्यालयातून रीतसर उमेदवारी अर्जही घेतला होता.

  • 13/26

    यानंतर त्यांनी शशी थरूर यांचीही भेट घेतली होती.

  • 14/26

     झारखंडचे माजी मंत्री के. एन. त्रिपाठी यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. 

  • 15/26

    शशी थरूर यांनी एकूण पाच उमेदवारी अर्ज भरले आहेत.

  • 16/26

    पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील ‘अधिकृत उमेदवारा’बाबत होत असलेली चर्चा मला माहीत आहे.

  • 17/26

    पण कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचे सोनिया गांधी यांनी मला सांगितले आहे.

  • 18/26

    तुम्हाला सध्याचीच परिस्थिती कायम ठेवायची असेल तर तुम्ही खरगेंना मत द्या, पण तुम्हाला पक्षात बदल आणि प्रगती हवी असेल, तर मी त्या बदलासाठीच उभा आहे. असं थरूर म्हणाले आहेत.

  • 19/26

    गेहलोत यांनी राजस्थानमधील ‘बंडा’बद्दल सोनियांशी चर्चा केली.

  • 20/26

    आणि राजस्थानमध्ये झालेल्या राजकीय गोंधळासाठी सोनिया गांधींची माफी मागितली आहे.

  • 21/26

    ‘गेल्या दोन दिवसांतील घडामोडींमुळे मी आता पक्षाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार नाही’’, असे गेहलोत यांनी जाहीर केले होते.

  • 22/26

    ‘‘राजस्थानमध्ये जे झाले, त्याचा सर्वानाच धक्का बसला असून, मी सोनियांची माफी मागितली आहे. एका वाक्याचा ठराव संमत व्हायला हवा होता’’

  • 23/26

    सोनिया यांनी अशोक गेहलोत यांना पक्षाध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला होता. पण, राजस्थानमधील सुमारे ९० गेहलोत समर्थक आमदारांनी सोनियांच्या दुतांना भेटण्यास नकार दिला होता.

  • 24/26

    अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर राजस्थानचे नेतृत्व कोण करणार हे काँग्रेसचे नेतृत्व ठरवेल, असेही अशोक गेहलोत म्हणाले होते.

  • 25/26

    देशातील सध्याची परिस्थिती पाहता एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभे राहण्याची नितांत गरज आहे, असं गेहलोत यांनी म्हटलं होतं.

  • 26/26

    काँग्रेसमधील अन्य नेत्यांनी ही निवडणूक लढवायचे ठरवले असल्यास माझी हरकत नाही, असंही गेहलोत यांनी म्हटलं होतं.

TOPICS
अशोक गहलोतAshok Gehlotकाँग्रेसCongressदिग्विजय सिंहDigvijay Singhमल्लिकार्जुन खरगेMallikarjun Khargeशशी थरूरShashi Tharoorसोनिया गांधीSonia Gandhi

Web Title: Photos finally kharge vs tharoor fight for the post of congress president msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.