• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra gram panchayat election results ajit pawar reacts on question of bjp number one and ncp 4th in initial counting scsg

…अन् भाजपाचा उल्लेख असणारा ‘तो’ प्रश्न ऐकून चढ्या आवाजातच अजित पवार पत्रकाराला म्हणाले, “३२ वर्षे झाली मी…”

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार अकोल्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधत असतानाहा घडला हा प्रकार

Updated: October 17, 2022 18:27 IST
Follow Us
  • Maharashtra Gram Panchayat Election Results Ajit Pawar Reacts on Question of bjp number one and ncp 4th in initial counting
    1/12

    महाराष्ट्रामधील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. याच निकालासंदर्भात बोलता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना फैलावर घेतल्याचं चित्र अकोल्यामध्ये पहायला मिळालं.

  • 2/12

    झालं असं की , १ हजार १६५ पैकी ४७१ ग्रामपंचायतींचा निकाल दुपारी दीडपर्यंत हाती आला होता. त्यामध्ये १०१ जागांवरवर भाजपा, ५९ ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गट विजयी झाला.

  • 3/12

    तर ६१ ग्रामपंचायतींमध्ये ठाकरे गटाने, काँग्रेसने ६२ तर राष्ट्रवादी काँग्रेसने ५० ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळावल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत होतं.

  • 4/12

    यावरुनच अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता ही आकडेवारी धादांत खोटी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांमधील वृत्तांकनावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

  • “४०० च्यावर निकाल हाती आले आहेत. भाजपा १ नंबरला दिसतंय राष्ट्रवादी चार नंबर दिसतंय,” असं म्हणत पत्रकाराने प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी यावर आपलं मत मांडताना प्रसारमाध्यमांनाच लक्ष्य केलं.
  • 5/12

    “मी तुम्हाला सांगू का हे सगळं तुम्ही धादांत खोटं बोलत असता. मागच्या वेळेसही तुम्ही असं सांगितलं. प्रत्यक्षात वस्तूस्थिती तशी नसते. आमदारकीची निवडणूक चिन्हावर होते. खासदारकीची निवडणूक चिन्हावर होते. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगर पंचायती या चिन्हावर होतात. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका चिन्हावर होत नाहीत,” असं अजित पवार म्हणाले.

  • 6/12

    “चिन्हावर निवडणूक होत नसताना तुम्हाला कसं कळलं की हा कुठल्या पक्षाचा आहे?” असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी पत्रकाराला विचारला.

  • 7/12

    “माझं तर म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना चिन्हाचं वाटप होतं. तर ग्रामपंचायतीला पण चिन्हावर निवडणुका झाल्या पाहिजेत. म्हणजे स्पष्ट चित्र कळेल,” असंही अजित पवार म्हणाले.

  • 8/12

    “आम्ही पण म्हणतो आमच्या जास्त आल्या. भाजपा म्हणजे आमच्या जास्त जागा आल्या. शिवसेना म्हणते आमच्या जास्त जागा आल्या. काँग्रेस म्हणते आमच्या जास्त आल्या. तुम्ही मिडियावाले कसं चालवता तुमचं तुम्हाला माहिती,” असा टोला अजित पवारांनी लगावला.

  • 9/12

    “ते त्या पक्षाला मानणारे असतात” असं म्हणत पत्रकाराने अजित पवारांना उत्तर दिलं.

  • 10/12

    हे ऐकून अजित पवार यांनी थेट स्वत:च्या राजकीय कारकिर्दीचाच उल्लेख करत पत्रकाराला सुनावलं.

  • 11/12

    “अजिबात असं नाहीय. ३२ वर्षे झाली मी राजकारण, समाजकारण करतोय,” असं चढ्या आवाजात म्हणत ग्रामपंचायतींमध्ये मतदान हे पक्ष पाहून नाही तर उमेदवारांच्या आधारे होत असल्याचं सूचक विधान अजित पवारांनी केलं.

TOPICS
अजित पवारAjit Pawarकाँग्रेसCongressभारतीय जनता पार्टीBJPराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPशिवसेनाShiv Sena

Web Title: Maharashtra gram panchayat election results ajit pawar reacts on question of bjp number one and ncp 4th in initial counting scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.