-
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकण दौऱ्यावर असताना गुरुवारी (१ डिसेंबर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली.
-
त्यावेळी त्यांनी सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून सुरू असलेल्या वादापासून इतिहास लेखन आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटापर्यंत अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.
-
राज ठाकरेंच्या याच पत्रकार परिषदेतील महत्त्वाच्या मुद्द्यांचा हा आढावा…
-
आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही – राज ठाकरे
-
आपल्या इतिहासातील गोष्टी पोर्तुगीज, मोघल, ब्रिटिशांकडून आल्या आहेत – राज ठाकरे
-
महाराजांच्या काळातील एक ग्रंथ म्हणजे शिवभारत. त्यात ज्या गोष्टी सापडतात त्या आपल्यासमोर आहेत. या व्यतिरिक्त आपल्याकडे काही दाखले, पत्रच नाहीत – राज ठाकरे
-
सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याशिवाय तुम्ही इतिहास दाखवूच शकत नाही – राज ठाकरे
-
फक्त इतिहासाला धक्का लागणार नाही हे बघणं गरजेचं आहे. अशाप्रकारे शिवरायांना धक्का लावणारा मायेचा पूत अजून जन्माला यायचा आहे – राज ठाकरे
-
जातीपलिकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं आहे – राज ठाकरे
-
सध्या जातीतून इतिहास पाहण्याचं पेव फुटलं आहे – राज ठाकरे
-
ठराविक मुठभर लोकच जातीतून इतिहास पाहत आहेत – राज ठाकरे
-
जातीतून इतिहास पाहणाऱ्यांचा राजकीय स्वार्थ आहे – राज ठाकरे
-
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात दिग्दर्शकाने सहा जणांची नावं टाकली, पण आतापर्यंत आपण जी नावं ऐकली ती सर्व काल्पनिक नावं आहेत – राज ठाकरे
-
इतिहासाचे अभ्यासक गजानन मेहंदळे यांच्यानुसार, प्रतापराव गुजर यांच्याबरोबर कोणत्या नावाचे कोण लोक होते याविषयी जगातल्या कोणत्याही इतिहासाच्या पानावर कोठेही लिहिलेलं नाही – राज ठाकरे
-
इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनीही मला गजानन मेहंदळे बरोबर बोलत असल्याचं सांगितलं – राज ठाकरे (सर्व छायाचित्र संग्रहित)
Photos : मराठ्यांचं किंवा ब्राह्मणांचं इतिहास लेखन ते ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपट, राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
राज ठाकरेंच्या कुडाळमधील पत्रकार परिषदेतील मराठे, ब्राह्मण, इतिहास लेखन ते ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपट अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवरील वक्तव्यांचा आढावा…
Web Title: Important point of mns chief raj thackeray press conference in kudal sindhudurg pbs