-
भाजपाचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, असं वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय.
-
महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांनी चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा निषेध केला.
-
राज्यात ठिकठिकाणी या वक्तव्याविरोधात आंदोलन-मोर्चेही झाले.
-
अशातच शनिवारी (१० डिसेंबर) या वक्तव्याचा निषेध करत पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली.
-
या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हात जोडून विनंती करत पोलिसांवर निलंबनाची कारवाई करू नये, असं म्हटलं.
-
चंद्रकांत पाटील यांनी नेमकं काय म्हटलं याचा हा आढावा…
-
चंद्रकांत पाटील म्हणाले याची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील – चंद्रकांत पाटील
-
मात्र, या चौकशीत कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करून त्याचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं कारण नाही – चंद्रकांत पाटील
-
मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना जाहीरपणे हात जोडून विनंती करतो की, या प्रकरणात एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याचा दोष असला, तरी त्या कर्मचाऱ्याला निलंबित करू नये – चंद्रकांत पाटील
-
मी त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही – चंद्रकांत पाटील
-
मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे म्हणतील ते करायचं आहे – चंद्रकांत पाटील
-
बावनकुळे म्हटले निदर्शने करा, तर करा. ते म्हणाले उद्या महाराष्ट्रात मोदी आहेत, म्हणून कोणीही प्रतिक्रिया द्यायची नाही, तर कोणीही प्रतिक्रिया द्यायची नाही – चंद्रकांत पाटील
-
पुण्याहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते निघाले आहेत. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला माझी शपथ आहे – चंद्रकांत पाटील
-
कोणीही इथं येऊ नका. सर्वजण आपआपल्या ठिकाणी परत जा – चंद्रकांत पाटील
-
माझा एक कार्यकर्ता फोनवर रडायला लागला, म्हणाला की मी परत जाणार नाही – चंद्रकांत पाटील
-
मी त्याला सांगितलं की, परत जावं लागेल. माझ्या शपथेला काय अर्थ आहे – चंद्रकांत पाटील
-
मी पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो की, कायदा हातात घेऊ नका – चंद्रकांत पाटील
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा हातात घ्यायला आपल्याला शिकवलं नाही – चंद्रकांत पाटील (सर्व फोटो व्हिडीओतून साभार)
Photos : “शिंदे-फडणवीसांना हात जोडून विनंती आहे की…”, शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हात जोडून विनंती करत पोलिसांवर निलंबनाची कारवाई करू नये, असं म्हटलं.
Web Title: Chandrakant patil request cm eknath shinde dcm devendra fadnavis to not suspend police after ink throwing incident pbs