• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. satyajeet tambe answer question of become bjp candidate in election alliance with congress pbs

Photos : तुम्ही भाजपा पुरस्कृत उमेदवार होणार का? सत्यजीत तांबे म्हणाले, “एका उदात्त हेतूने…”

पत्रकारांनी सत्यजीत तांबेंना काँग्रेस-भाजपाची एकत्र येण्याची काही रणनीती आहे का? तुम्ही भाजपा पुरस्कृत उमेदवार होणार का? असे प्रश्न विचारले. त्यावर सत्यजीत तांबेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (१२ जानेवारी) नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

Updated: January 16, 2023 11:34 IST
Follow Us
  • नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकासआघाडीकडून काँग्रेसला देण्यात आली. यानंतर काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली.
    1/27

    नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकासआघाडीकडून काँग्रेसला देण्यात आली. यानंतर काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली.

  • 2/27

    मात्र, सुधीर तांबेंनी मुलगा सत्यजीत तांबेंसाठी माघार घेतली आणि मुलाचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. यानंतर सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

  • 3/27

    या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी सत्यजीत तांबेंना काँग्रेस-भाजपाची एकत्र येण्याची काही रणनीती आहे का? तुम्ही भाजपा पुरस्कृत उमेदवार होणार का? असे प्रश्न विचारले. त्यावर सत्यजीत तांबेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (१२ जानेवारी) नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

  • 4/27

    मी भाजपा पुरस्कृत उमेदवार असण्याचा प्रश्न नाही – सत्यजीत तांबे

  • 5/27

    मी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, मनसेपासून रासपापर्यंत सर्व पक्षांना विनंती करणार आहे – सत्यजीत तांबे

  • 6/27

    एका उदात्त हेतूने राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांनी माझ्या पाठिशी उभे रहावे आणि मला मदत करावी – सत्यजीत तांबे

  • 7/27

    भाजपाने मला मदत करावी, कारण माझ्यासारखा कार्यकर्ता २२ वर्षे संघटनेत चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करत आहे – सत्यजीत तांबे

  • 8/27

    युवकांचे प्रश्न मांडून मी एका राजकीय मंचावर काम करण्याचा प्रयत्न केला आहे – सत्यजीत तांबे

  • 9/27

    हेच युवकांचे, महिलांचे, बेरोजगारांचे प्रश्न मोठ्या पटलावर घेऊन जायचे असतील, तर विधान परिषद हा चांगला मंच आहे. म्हणून मला सर्वच पक्षांनी मदत केली, तर मी अधिक ताकदीने मांडू शकेन – सत्यजीत तांबे

  • 10/27

    मी भाजपा नेत्यांना भेटून मदत करण्याचं आवाहन करणार आहे – सत्यजीत तांबे

  • 11/27

    भाजपा मला पाठिंबा देणार की नाही हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. शेवटी हा मोठा पक्ष आहे – सत्यजीत तांबे

  • 12/27

    मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती करणार आहे की, त्यांनी मला पाठिंबा द्यावा – सत्यजीत तांबे

  • 13/27

    एकमेकांना मदत करण्याची महाराष्ट्रातील राजकारणाची परंपरा आहे – सत्यजीत तांबे

  • 14/27

    राज्यात अनेक निवडणुका आपण बिनविरोध केल्या आहेत. म्हणून याही निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी मला पाठिंबा द्यावा अशी माझी विनंती आहे – सत्यजीत तांबे

  • 15/27

    आम्ही काँग्रेस पक्षाकडे मागणी केली होती की, यावेळी मला उमेदवारी द्यावी – सत्यजीत तांबे

  • 16/27

    काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींमध्ये अनेक लोकांची मी पक्षाच्या वतीने उमेदवारी करावी अशी इच्छा होती – सत्यजीत तांबे

  • 17/27

    काँग्रेस पक्षाने मात्र निर्णय घेताना डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला – सत्यजीत तांबे

  • 18/27

    आज दुपारी त्यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्याने मला शेवटच्या क्षणाला अपक्ष म्हणून अर्ज भरावा लागला – सत्यजीत तांबे

  • 19/27

    असं असलं तरी मी अर्ज भरताना दोन भरले आहेत. एक अर्ज काँग्रेसचा आहे आणि एक अपक्ष म्हणून अर्ज आहे – सत्यजीत तांबे

  • 20/27

    माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेवर येऊ न शकल्याने आता मला अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागेल. परंतु मी काँग्रेसचाच उमेदवार आहे. मी आजपर्यंत काँग्रेसच्या विचारावर काम केलं आहे – सत्यजीत तांबे

  • 21/27

    असं असलं तरी मी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना भेटणार आहे. मी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या सर्व नेत्यांना भेटणार आहे. मी भाजपाच्याही सर्व नेत्यांना भेटणार आहे – सत्यजीत तांबे

  • 22/27

    मी सर्वांना भेटून विनंती करणार आहे की, राजकीय पक्षांच्या पलिकडे जाऊन सर्वांनी या निवडणुकीत माझ्या पाठिशी उभं रहावं – सत्यजीत तांबे

  • 23/27

    काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आणि आमची यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती – सत्यजीत तांबे

  • 24/27

    किंबहुना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीच इच्छा होती की, मी निवडणूक लढवावी. परंतू तांत्रिक कारणामुळे डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, माझी उमेदवारी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आहे – सत्यजीत तांबे

  • 25/27

    सर्व पक्षाच्या लोकांनी मला मदत करावी. मी भाजपाच्या नेत्यांना जाऊन भेटणार आहे. तसेच त्यांनी मला मदत करावी अशी विनंती करणार आहे – सत्यजीत तांबे

  • 26/27

    बाळासाहेब थोरात यांची तब्येत ठीक नाही. म्हणून ते आज उमेदवारी अर्ज भरताना सोबत नव्हते – सत्यजीत तांबे

  • 27/27

    बाळासाहेब थोरात आणि धनंजय मुंडे एकाच रुग्णालयात आहेत. त्यामुळे ते धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी गेले आहेत. ते दोघेही ब्रिचकँडी रुग्णालयात आहेत – सत्यजीत तांबे

TOPICS
काँग्रेसCongressनाशिकNashikनाशिक न्यूजNashik Newsनिवडणूक २०२४Electionबाळासाहेब थोरातBalasaheb Thoratभारतीय जनता पार्टीBJP

Web Title: Satyajeet tambe answer question of become bjp candidate in election alliance with congress pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.