• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. nana patole on congress mahavikad aghadi rally hindutva and ayodhya tour ssa

PHOTOS : हिंदुत्व, अयोध्या दौरा ते महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या सभा; नाना पटोलेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

“छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, त्या हिंदुत्वाचे…”

April 7, 2023 18:54 IST
Follow Us
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज ( ७ एप्रिल ) नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा महाविकास आघाडी सभा, काँग्रेसच्या सभा, हिंदुत्व, अयोध्या दौरा यावर भाष्य केले आहे.
    1/9

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज ( ७ एप्रिल ) नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा महाविकास आघाडी सभा, काँग्रेसच्या सभा, हिंदुत्व, अयोध्या दौरा यावर भाष्य केले आहे.

  • 2/9

    नाना पटोले म्हणाले, “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि नेत्या प्रियंका गांधी यांच्या सहा सभा महाराष्ट्रात होतील. यासंदर्भात १० एप्रिलला ठाण्यात प्रदेश काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली आहेत. यावर तिथे चर्चा करण्यात येईन. या सभा मोठ्या स्वरूपात कशा करण्यात येतील, याचे नियोजन करून केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात येणार आहे,” अशी माहिती नाना पटोलेंनी दिली आहे.

  • 3/9

    या सभांना महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असतील का? आणि सभा कधी पार पडणार आहे? असे विचारले असता नाना पटोले म्हणाले, “पहिली सभा या महिन्यात होण्याची शक्यता आहे.”

  • 4/9

    “कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात या सभांचे राज्यात आयोजन केले जाणार आहे. केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील सहकारी पक्षांना निमंत्रण देण्यास सांगितलं, तर देण्यात येईल.”

  • 5/9

    ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष सत्याग्रह यात्रेत सावकरांचा फोटो लावणार असल्याचं बोलले जात आहे. याबद्दल विचारले असता नाना पटोलेंनी सांगितलं, “काही गोष्टी चुकीच्या माध्यमांत आल्या आहेत. अध्यक्षांना याबाबत विचारले असता, त्यांनी असं काही केलं नसल्याचं म्हटलं. काही माध्यमांनी मूळ मुद्द्याला बाजूला करण्यासाठी भाजपाची सुपारी घेतल्याचं वाटते.”

  • 6/9

    “कारण, अद्यापही शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडला आहे. शेतकऱ्यांची काळजी राज्य आणि केंद्र सरकारला नाही आहे. तूर, हरभरा दाळ, द्राक्ष, कांदा शेतकऱ्यांचे वाटोळे सुरू असून आत्महत्या होत आहेत.”

  • 7/9

    “अशी एखादी कोणतीतरी गोष्ट घेऊन, त्याला माध्यमांवर प्रसिद्धी दिली जाते. पण, आमचे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आहे. आमचे हिंदुत्व येऱ्या गबाळ्याचे नाही. ही भूमिका आम्ही सातत्याने मांडली आहे,” असे नाना पटोलेंनी म्हटले.

  • 8/9

    “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. त्या हिंदुत्वाचे समर्थन आम्ही करत आहोत. आम्ही दुसऱ्यांचे करत नाहीत,” असे नाना पटोलेंनी सांगितलं.

  • 9/9

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर आहेत, याबद्दल विचारल्यावर नाना पटोले म्हणाले, “बिलकूल गेले पाहिजेल. प्रभू श्री राम आपले दैवत आहे. मला निमंत्रण असून, मी सुद्धा अयोध्येला जाणार आहे.”

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeकाँग्रेसCongressनाना पटोलेNana Patoleमहाविकास आघाडीMahavikas Aghadiराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Nana patole on congress mahavikad aghadi rally hindutva and ayodhya tour ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.