-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णयाची घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या खांद्यावर पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
-
यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
-
यावर शरद पवार यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
-
शरद पवार म्हणाले, “अजित पवार यांच्याबद्दल सुरु असलेल्या वृत्तांमध्ये १ टक्केही सत्य नाही.”
-
“नव्या निवडीनंतर दोन लोक नाराज असल्याचं वृत्त चालवलं जात आहे.”
-
“यातील एक म्हणजे जयंत पाटील… महाराष्ट्र राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडं आहे. तर, अजित पवारांकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.
-
“प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळेंची यांच्याकडं कोणतीही जबाबदारी नाही. वेळ देण्याची तयारी असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आली.”
-
“नाराजीच्या चर्चा चुकीच्या आहेत. आज करण्यात आलेल्या नियुक्तींबाबत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांबरोबर मागील एक महिन्यांपासून चर्चा सुरू होती.”
-
“त्यावर आज निर्णय घेण्यात आला,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
“…म्हणून सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड,” शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण
शरद पवार म्हणतात, “नव्या निवडीनंतर दोन लोक नाराज असल्याचं वृत्त चालवलं जात आहे, पण…”
Web Title: Sharad pawar on supriya sule and prafull patel working president ssa