• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mns chief raj thackeray on pm narendra modi bjp targets sharad pawar ncp pmw

राज ठाकरेंनी सांगितलं भाजपाच्या यशामागचं कारण; म्हणाले, “नरेंद्र मोदींचं ‘ते’ यश हे…!”

राज ठाकरे म्हणाले, “१९५२ साली जनसंघाची स्थापना झाली. त्यानंतर १९८० साली त्याचं…!”

Updated: March 10, 2024 17:26 IST
Follow Us
  • raj thackeray marathi news (8)
    1/10

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या वर्धापनदिनी केलेल्या भाषणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या भाषणात राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

  • 2/10

    आपल्या भाषणात राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना धीर ठेवण्याचं आवाहन केलं. तसेच, “आपलं यश कुठेही जाणार नाही, धीर धरा”, असंही ते म्हणाले.

  • 3/10

    “आपल्याकडे सध्या प्रत्येकाला वडा टाकला की तळून आला पाहिजे. पण त्याच्यासाठी बटाटा शिजवावा लागतो. आणखी काही गोष्टी टाकाव्या लागतात. त्याच्यासाठी पीठ करावं लागतं. इतर गोष्टी असतात. ही सगळी प्रक्रिया बाजूला, फक्त आम्ही बटाटा टाकणार. तो तळून आला पाहिजे. सगळ्या गोष्टी फास्टफूड स्तरावर गेल्या आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.

  • 4/10

    मी एक गोष्ट मनसैनिकांना सांगेन. राजकारणात जर तुम्हाला वावरायचं असेल, राहायचं असेल, टिकायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे पेशन्स – राज ठाकरे

  • 5/10

    आपल्याला वाटतं २०१४ साली आलेलं यश नरेंद्र मोदींचं आहे. त्यातला काही भाग असेल. पण ते सगळं श्रेय इतकी वर्षं त्या पक्षासाठी झटत असलेल्या कार्यकर्त्यांचं आहे – राज ठाकरे

  • 6/10

    १९५२ साली त्यांचा जनसंघ पक्ष स्थापन झालाय. १९८० साली त्याचं भारतीय जनता पक्ष असं नामकरण झालं. ५२ सालापासून लालकृष्ण आडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, सूर्यभान वहाटणे, हशू अडवाणी अशा अनेक लोकांनी इतकी वर्षं खाल्लेल्या खस्तांमधून आलेलं हे यश आहे. अचानक मिळालेलं यश नाहीये – राज ठाकरे

  • 7/10

    अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आधी १३ दिवसांचं आलं. नंतर १३ महिन्यांचं आलं. नंतर साडेचार वर्षांचं आलं. नंतर १० वर्षं परत काँग्रेस होती – राज ठाकरे

  • 8/10

    गेल्या १८ वर्षांत मी राजकारणात अनेक चढउतार पाहिले. चढ कमी, पण उतारच जास्त पाहिले. पण या संपूर्ण उतारात सगळे मनसैनिक माझ्याबरोबर राहिले – राज ठाकरे

  • 9/10

    यश कुठे जातंय. निश्चित मिळणार. हे यश मी तुम्हाला मिळवून देणार. हा माझा शब्द आहे तुम्हाला. पण त्यासाठी पेशन्स लागतात. ते तुमच्यात नसतील, तर काही मिळणार नाही – राज ठाकरे

  • 10/10

    महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं कुठले पक्ष स्थापन झाले असतील, तर पहिला जनसंघ, दुसरा शिवसेना आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना. यातल्या ९९ टक्के लोकांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता – राज ठाकरे (सर्व छायाचित्रे: मनसे अधिकृतवरून साभार)

TOPICS
पंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमनसेMNSमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra Politicsराज ठाकरेRaj Thackeray

Web Title: Mns chief raj thackeray on pm narendra modi bjp targets sharad pawar ncp pmw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.