Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. india alliance joint protest against arrest of cm arvind kejariwal spl

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ ‘इंडिया’ आघाडीचे ‘सत्याग्रह’ आंदोलन! नेमकं काय घडलं?

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर्स घेऊन केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ निदर्शने केली.

Updated: March 30, 2024 07:45 IST
Follow Us
  • india alliance Joint protest 29 march 2024
    1/9

    आझाद मैदान मुंबई येथे आज सकाळी (२९ मार्च) ‘इंडिया’ आघाडीतील सर्व पक्षांनी मिळून ‘सत्याग्रह’ आंदोलन केले. हे आंदोलन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आयोजित केले होते. (Photo-Loksatta)

  • 2/9

    यावेळी आयोजित सत्याग्रह आंदोलनात ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी उपस्थिती लावली. तर कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर्स घेऊन केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ निदर्शने केली. आंदोलनातील उपस्थित सर्व नेत्यांनी यावेळी भाजपाला केजरीवाल यांच्या अटकेवरून चांगलेच घेरल्याचे पाहायला मिळाले. (Express Photo)

  • 3/9

    या सत्याग्रह आंदोलनाला आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षाताई गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्यासह इतरही नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Express Photo)

  • 4/9

    यावेळी कार्यकर्त्यांनी देखावे सदर केले. नेत्यांनी भाषणे दिली. या आंदोलनात भाजपाविरुद्ध ‘इंडिया’ आघाडीतील कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. (Express Photo)

  • 5/9

    यावेळी आप नेत्या प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, “हा या देशाचा काळा काळ चालू आहे आणि यासाठी आमचा भाजपाला विरोध आहे. आम्ही या निमित्ताने संविधान वाचवण्यासाठी लोकांना जागृत करत आहोत.” (Express Photo)

  • 6/9

    काँग्रेस नेत्या वर्षाताई गायकवाड म्हणाल्या “या देशाची लोकशाही आणि देशाचे संविधान शिल्लक आहे की नाही? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. यावेळी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ची लढाई आहे. या निमित्ताने संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया.” (Photo-Loksatta)

  • 7/9

    काँग्रेसचे आमदार भाई जगताप म्हणाले की “इंग्रज सरकार ज्या पद्धतीने आपल्या सर्व संसाधनांचा वापर विरोधकांना नामोहरम करण्यासाठी करत होते त्याचपद्धतीने भाजपा सरकार ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर विरोधकांवर करत आहे. अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक बेकायदेशीर असून त्यांची सुटका झाली पाहिजे” (Express Photo)

  • 8/9

    राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष (शरद पवार) विद्या चव्हाण यांनी सांगितलं “अरविंद केजरीवाल यांची सुटका झाली पाहिजे कायद्याचा दुरुपयोग थांबला पाहिजे. कोणतीही योजना राबवणे हा मुख्यमंत्री म्हणून त्यांना अधिकार असतो. याचा अर्थ त्यांनी त्या योजना भ्रष्टाचारासाठी सुरु केल्या असा नाही होत. आम्ही इंडिया आघाडी म्हणून केजारीवालांच्या अटकेचा निषेध करत आहोत.” (Express Photo)

  • 9/9

    कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर्स घेऊन केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ निदर्शने केली. जिवंत देखावा सादर करत, अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या घोषणा देत या आंदोलनात सहभाग घेतला. (Express Photo)

TOPICS
अरविंद केजरीवालArvind Kejriwalआम आदमी पार्टीAAPकाँग्रेसCongressभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsमुंबईMumbaiराजकारणPolitics

Web Title: India alliance joint protest against arrest of cm arvind kejariwal spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.