• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. jammu kashmir elections rahul gandhi speech criticized central government spl

Rahul Gandhi Speech: जम्मू काश्मीरमध्ये सत्तेत येण्याचा राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास, भाषणातून केंद्रावर केली टीका

जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी काल (४ सप्टेंबर) प्रचारसभेत बोलत होते.

Updated: September 5, 2024 11:20 IST
Follow Us
  • Jammu Kashmir elections Rahul Gandhi speech criticized central government
    1/15

    जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी काल (४ सप्टेंबर) प्रचारसभेत बोलत होते.

  • 2/15

    श्रीनगरपासून ७५ किमी अंतरावर दुरु येथील प्रचारसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली. दुरु मतदारसंघातून काँग्रेस सरचिटणीस जी.ए.मिर हे रिंगणात आहेत.

  • 3/15

    जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा मिळवून देणे ही देशवासीयांची सामूहिक जबाबदारी आहे. विधानसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारने जर हा निर्णय घेतला नाही तर, इंडिया आघाडी केंद्रात सत्तेत आल्यावर पहिला निर्णय राज्याचा दर्जा देण्याबाबतचा घेईल, अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.

  • 4/15

    विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्य दर्जा द्यावा अशी आमची मागणी होती, तर भाजपला निवडणुकीनंतर हा निर्णय घ्यायचा आहे. – राहुल गांधी

  • 5/15

    जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार हे निश्चित. जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देऊन जनतेचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोप राहुल यांनी केला. 

  • 6/15

    हा येथील जनतेवर अन्याय आहे. जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालांचे वर्तन २१व्या शतकातील राजासारखे असल्याचा टोला राहुल यांनी लगावला.

  • 7/15

    तसेच बाहेरील नागरिकांना सारे लाभ मिळत असल्याचा दावा राहुल यांनी केला.

  • 8/15

    ही केवळ जम्मू आणि काश्मीरमधील लढाई नाही तर देशभरात हा संघर्ष असून, भाजप तसेच संघ हे लोकशाहीवर हल्ला करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

  • 9/15

    निवडणूक आयोग, नोकरशाही तसेच माध्यमांवर नियंत्रण असल्याची नाराजी राहुल यांनी व्यक्त केली.

  • 10/15

    सत्तेत येण्याचा विश्वास
    जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेस तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार येईल, असा विश्वास राहुल गांधी यांनी संगल्डन येथील सभेत केला. 

  • 11/15

     रामबन जिल्ह्यात बनिहल मतदारसंघाचा हा भाग आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष विकास रसून वाणी येथून रिंगणात आहे.

  • 12/15

    नॅशनल कॉन्फरन्सने सजाद शाहीन यांना उमेदवारी दिली असून, भाजपने सलीम भट यांना संधी दिली आहे.

  • 13/15

    येथे काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात मैत्रीपूर्ण लढत आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो: लोकसत्ता संग्रहित)

  • 15/15

    हेही वाचा: PM Modi In Brunei : पीएम नरेंद्र मोदी पोहोचले ब्रुनेईत; भारतीय नागरिकांकडूनही पंतप्रधानांचे स्वागत, पाहा फोटो

TOPICS
जम्मू-काश्मीरJammu Kashmirनिवडणूक २०२४Elections 2024मराठी बातम्याMarathi Newsराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Jammu kashmir elections rahul gandhi speech criticized central government spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.