-
भाजपाच्या विधीमंडळ गटनेतेपदी फडणवीस
भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी अखेर देवेंद्र फडणवीसांची निवड झाली आहे. -
भाजप आमदारांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवारांनी फडणवीसांच्या गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला.
-
याला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक आमदारांनी अनुमोदन दिले. त्यामुळे आता फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे.
-
गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस म्हणाले…
एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा मोदींनी या पदावर बसवलं. अर्थात, एकदा ७२ तासांसाठीच होतो. पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो. त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा मान मोदींनी दिला. हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला. त्यातूनच सामान्य कार्यकर्त्याला वेगवेगळी पदं मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही आभार मानतो – देवेंद्र फडणवीस -
फडणवीसांची गटनेतेपदी निवड होताच जल्लोष
भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानाबाहेर ढोल वाजवत, उत्साहाने नाचत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. दरम्यान, उद्या ५ डिसेंबरला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि त्यासोबतच दोन उपमुख्यमंत्रीही शपथ घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. -
मी एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे आभार मानतो. आरपीआयचे नेते रामदास आठवले आणि आमच्या सर्व मित्रपक्षांचेही आभार मानतो. संविधानाची यावेळी ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. त्यामुळे सर्वार्थानं महत्त्वाचं असं हे वर्षं आहे. मोदी नेहमी सांगतात की कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा माझ्यासाठी देशाचं संविधन सर्वात महत्त्वाचं आहे. या संविधानाने प्रत्येक भारतीयाला जगण्याचा, मोठं होण्याचा अधिकार दिला. भारताला उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं. संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात पुन्हा सरकार स्थापन करतोय – देवेंद्र फडणवीस
-
भाजप गटनेतेपदाच्या बैठकीत सीतारमण म्हणाल्या…
विधिमंडळ गटनेतेपद निवडीवेळी भाजपाच्या केंद्रीय निरिक्षक निर्मला सीतारमण उपस्थित होत्या. -
गटनेतेपदी फडणवीसांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन.
महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेने देशाला संदेश दिला.
महाराष्ट्रील अनपेक्षित यशातून संपूर्ण देशाला संदेश.
महाराष्ट्रातील जनतेने विकासाला मत दिले. – निर्मला सीतारमण -
महायुती सरकार संकल्पपत्रातील घोषणांची पूर्तता करेल.
महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचा विकास खुंटला.
पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान.
केंद्र सरकार महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील. – निर्मला सीतारमण
(सर्व फोटो साभार- देवेंद्र फडणवीस/निर्मला सीतारमण सोशल मीडिया)
हेही पाहा- महाराष्ट्रातील ‘या’ २१ मतदारसंघांचे प्रतिनिधित्व महिला आमदारांच्या हाती
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री! भाजपाच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड, भाषणात म्हणाले…
Devendra Fadnavis New CM of Maharashtra : देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जोरदार भाषण केले, विधिमंडळ गटनेतेपद निवडीवेळी भाजपाच्या केंद्रीय निरिक्षक निर्मला सीतारमण उपस्थित होत्या
Web Title: Devendra fadnavis maharashtra new chief minister maharashtra government formation nirmala sitharaman mahayuti bjp spl