• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. ramdas kadam challenge to uddhav thackeray in balasaheb thackery death shivsena matoshtree politics gkt

Ramdas Kadam : ‘मी तोंड उघडलं तर मातोश्रीला हादरा बसेल’, रामदास कदमांचं वक्तव्य; उद्धव ठाकरेंना दिला इशारा

रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत गंभीर दावा केला. त्यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

October 3, 2025 17:28 IST
Follow Us
  • Ramdas Kadam On Uddhav Thackeray Balasaheb Thackery Death
    1/1

    शिवसेना (शिंदे) नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत केलेल्या गंभीर दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 2/1

    रामदास कदमांनी काय दावा केला? : बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे उद्धव ठाकरे यांनी घेतले असल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 3/1

    रामदास कदम यांनी आज पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत पत्रकार परिषद घेत पुन्हा मोठं भाष्य करत आपण केलेल्या विधानावर ठाम असल्याचं सांगितलं. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 4/1

    उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान : “मी खोटं बोलतोय हे उद्धव ठाकरेंनी सांगून दाखवावं”, अशा शब्दांत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 5/1

    “बाळासाहेब ठाकरे तुमच्याबाबत काय-काय बोलले ते मला बोलायला लावू नका. काल मी जे अनावधानाने बोलून गेलो ते चूक नाही तर वास्तव आहे”, असा इशाराही कदम यांनी दिला. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 6/1

    “बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती का दिली नाही? तुम्ही त्यांच्या हाताचे ठसे घेतले की नाही हे शपथ घेऊन सांगा”, असंही कदम म्हणाले. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 7/1

    “मी शिवसेना प्रमुखांबरोबर निष्ठेने दिवस काढले आहेत. हजारो वेळा बाळासाहेबांनी माझी पाठ थोपटली. मीडियाने त्या डॉक्टरांना विचारावं ते सांगतील. सगळा काय विषय आहे तो संपेल’, असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 8/1

    “उद्धवजी हे पाप तुम्ही केलं आहे. उशीरा का होईना पण हे जनतेला कळूद्या. अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, मी त्या बोलणार नाही. पण वेळ पडली तर तर सोडणारही नाही”, असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 9/1

    ‘…तर मातोश्रीला हादरे बसतील’ : “अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. मी जेव्हा-जेव्हा तोंड उघडेन, तेव्हा मातोश्रीला हादरे बसतील. माझ्या नादाला लागू नका”, असा इशाराही रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना दिला.(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayबाळासाहेब ठाकरेBalasaheb Thackerayरामदास कदमRamdas KadamशिवसेनाShiv Senaशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)Shivsena UBT

Web Title: Ramdas kadam challenge to uddhav thackeray in balasaheb thackery death shivsena matoshtree politics gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.