• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. in 2022 sanju samson has hit the most number of sixes in odi matches for the indian team vbm

PHOTOS: यंदा भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये संजू सॅमसनने लगावले सर्वाधिक षटकार, टॉप-५ मध्ये ‘या’ खेळाडूंचा समावेश

२०२२ मध्ये भारतीय संघाकडून वनडे सामन्यात संजू सॅमसनने सर्वाधिक षटकार लगावले आहेत. त्याच्या पाठोपाठ श्रेयस अय्यर, शुबमन गिल आणि इतर खेळाडूंचा समावेश आहे.

Updated: November 27, 2022 18:13 IST
Follow Us
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनच्या जागी दीपक हुडा आणि शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली होती.
    1/9

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनच्या जागी दीपक हुडा आणि शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली होती.

  • 2/9

    कर्णधार धवन आणि संघ व्यवस्थापनाने संजू सॅमसनला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून वगळल्याचे कळल्यानंतर चाहते संतापले होते आणि सोशल मीडियावर आपला राग काढत आहेत.

  • 3/9

    चाहते ऋषभ पंतऐवजी सॅमसनला संघात संधी देण्याचा सल्ला देत आहेत.

  • 4/9

    न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत देखील संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती.

  • 5/9

    संजू सॅमसनने यावर्षी भारतीय संघासाठी एकदिवसीय सामन्यांच्या ९ डावात १४ षटकार ठोकले आहेत. सध्या २०२२ मध्ये वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो देशाचा पहिला फलंदाज आहे.

  • 6/9

    सॅमसननंतर श्रेयस अय्यरचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. अय्यरने या वर्षात भारतीय संघासाठी १० षटकार लगावले आहेत.

  • 7/9

    युवा फलंदाज शुबमन गिल तिसऱ्या स्थानावर आहे. गिलने यावर्षी भारतीय संघासाठी १० डावात ९ षटकार लगावले आहेत.

  • 8/9

    युवा सलामीवीर इशान किशन चौथ्या स्थानावर आहे. किशनने टीम इंडियासाठी ६ डावांत ८ षटकार लगावले आहेत.

  • 9/9

    अष्टपैलू अक्षर पटेलचे नाव पाचव्या स्थानावर आहे. पटेलने यावर्षी भारतीय संघासाठी वनडेत ४ सामने खेळताना ६ षटकार लगावले आहेत. (सौजन्य-ट्विटर)

TOPICS
इशान किशनIshan Kishanक्रिकेट न्यूजCricket Newsशुबमन गिलShubman Gillश्रेयस अय्यरShreyas Iyerसंजू सॅमसनSanju Samson

Web Title: In 2022 sanju samson has hit the most number of sixes in odi matches for the indian team vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.