• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. team india has reached pune to play the next match after beating pakistan warm welcome team was greeted with cheers at the airport avw

Team India: टीम इंडिया पुण्यनगरीत! बांगलादेशला चीत करण्यासाठी रोहित सेना सज्ज, विमानतळावर जल्लोषात स्वागत

World Cup 2023, Team India: पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करून पुढील सामना खेळण्यासाठी टीम इंडिया पुण्यात पोहोचली आहे. पुण्यानगरीतील विमानतळावर भारतीय संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Updated: October 15, 2023 21:13 IST
Follow Us
  • Team India reached Pune before the match against Bangladesh got a warm welcome at the airport
    1/12

    पाकिस्तानला सलग आठव्यांदा पराभूत केल्यानंतर टीम इंडिया पुढचा सामना खेळण्यासाठी पुण्यात पोहोचली आहे. पुण्यानगरीतील विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे, पुणे)

  • 2/12

    टीम इंडियाचा पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध आहे. हा सामना १९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे होणार आहे. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे, पुणे)

  • 3/12

    प्रदीर्घ कालावधीनंतर पुण्यात हा सामना होत आहे, त्यामुळे या सामन्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सामन्यात शुबमन गिलची तब्येत चांगली असल्याने त्यालाच पुन्हा संधी देण्यात येईल. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे, पुणे)

  • 4/12

    याआधी स्पर्धेत टीम इंडियाने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला पराभूत केले आहे. आगामी भारत विरुद्ध बांगलादेश विश्वचषक स्पर्धेतील पुण्यातील सामन्यात रोहित शर्माच्या नजरा सलग चौथ्या विजयावर असतील. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे, पुणे)

  • 5/12

    पुण्याची खेळपट्टी ही फलंदाजीला अधिक पोषक असल्याने तसेच, मैदानाची लांबी देखील कमी असल्याने येथे चौकार आणि षटकार खूप मारले जातात. या मैदानावर सर्वाधिक षटकार मारले जातात, असा इतिहास देखील आहे. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे, पुणे)

  • 6/12

    भारताची गोलंदाजी आतापर्यंतच्या तीनही सामन्यात मजबूत दिसून आली आहे. त्यामुळे फलंदाजीत तळाच्या फलंदाजांना जास्त फलंदाजीची संधी मिळालेली नाही. कदाचित या सामन्यात काही प्रमाणात फलंदाजी क्रमात बदल केले जातील. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे, पुणे)

  • 7/12

    कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीत उत्कृष्ट फॉर्मात आहे. श्रेयस अय्यर, विराट कोहली आणि के.एल राहुलही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सलामीवीर शुबमन गिलही परतला आहे. त्यामुळे टीम इंडियाचे पारडे जड आहे. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे, पुणे)

  • 8/12

    दुसरीकडे, विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताची विजयी घौडदौड कायम आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी हा सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने ३०.३ षटकात ७ गडी राखून सामना जिंकला. विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत ८ सामने झाले आहेत. भारतीय संघ प्रत्येक वेळी जिंकला आहे. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे, पुणे)

  • 9/12

    बांगलादेशच्या बाबतीत बोलायचे झाल्यास २००७साली त्यांनी विश्वचषकातून भारतीय संघाला बाहेर काढले होते. तसेच, आता श्रीलंकेत झालेल्या आशिया चषकातील सामन्यात देखील टीम इंडियाचा त्यांनी पराभव केला होता. त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही. भारतासाठी दोन गुण फार महत्वाचे आहेत.(फोटो सौजन्य – पवन खेंगरे, पुणे)

  • 10/12

    यजमान भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या तीनही सामन्यात एकतर्फी विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर कब्जा केला आहे. आता भारतीय संघ आपला चौथा सामना बांगलादेश विरुद्ध खेळेल आणि त्यांनाही चीतपट करेल अशी चाहत्यांना आशा आहे. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे, पुणे)

  • 11/12

    गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एमसीए स्टेडियमवर हा सामना होईल. बांगलादेश संघाने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात एक विजय आणि दोन पराभव स्वीकारले आहेत. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे, पुणे)

  • 12/12

    भारतीय संघाने चेन्नई येथे झालेल्या आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ६ गडी राखून पराभूत केले होते. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाने सात गडी राखून विजय मिळवलेला. तर पाकिस्तानला देखील भारताने सात गडी राखून नमवले.(फोटो सौजन्य – पवन खेंगरे, पुणे)

TOPICS
आयसीसी विश्वचषक २०२३ICC World Cupक्रिकेट विश्वचषक २०२३Cricket World Cupटीम इंडियाTeam IndiaपुणेPuneबांगलादेश क्रिकेट टीमBangladesh Cricket Teamभारत विरुद्ध पाकिस्तानInd vs Pakभारत विरुद्ध बांगलादेशIndia vs Bangladeshविश्वचषक २०२३World Cup

Web Title: Team india has reached pune to play the next match after beating pakistan warm welcome team was greeted with cheers at the airport avw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.