• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sachin tendulkars double century to k l rahuls on controversial statement top 10 moments from the india vs south africa series avw

Photos: सचिन तेंडुलकरचे द्विशतक ते के.एल. राहुल बाबतच्या वादग्रस्त विधानापर्यंत: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेतील टॉप १० क्षण

India vs South Africa series: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मालिका सुरु होत आहेत. या दोन्ही देशांच्या मालिकेत आतापर्यंत अनेक किस्से घडले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊ या.

December 7, 2023 20:05 IST
Follow Us
  • Sachin Tendulkar's double century to K.L. Rahul's on controversial statement Top 10 moments from the India vs South Africa series
    1/12

    भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १० तारखेपासून तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी खेळणार आहेत. या दोन्ही देशांमधील इतिहास हा खूप जुना आहे. त्यात अनेक चांगले-वाईट घटना घडल्या आहेत, त्यातील काही किस्से आपण जाणून घेऊ या. सौजन्य– (ट्वीटर)

  • 2/12

    सचिन तेंडुलकरच्या द्विशतक ते के.एल. राहुलच्या वादग्रस्त विधानापर्यंत, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेतील सर्वोतम १० क्षण फोटोंच्या माध्यमातून जाणून घेऊ या. सौजन्य- (ट्वीटर)

  • 3/12

    दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात, सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक झळकावणारा पहिला फलंदाज एक विक्रम केला. त्याने २०१० साली नाबाद २०० धावा करून इतिहास रचला होता. सौजन्य- (ट्वीटर)

  • 4/12

    २०१३ची जोहान्सबर्गमधील कसोटी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शाब्दिक चकमकीबाबत ओळखली जाईल. ४५८चे लक्ष्य भारताने दिलेले असताना आफ्रिकेने चांगलीच झुंज दिली. त्यांनी ४५० धावांपर्यंत मजल मारली आणि शेवटी हा सामना अनिर्णित राहिला. सौजन्य- (ट्वीटर)

  • 5/12

    प्रतिस्पर्ध्यातील एक वाईट घटना म्हणजे, २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए मॅच फिक्सिंगच्या आरोपांमध्ये अडकला होता. परिणामी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला खेळता येणार नाही अशी आजीवन बंदी घालण्यात आली. सौजन्य- (ट्वीटर)

  • 6/12

    १९९६-९७चा टीम इंडियाचा दौरा नेहमी लक्षात राहील. त्या विस्मरणीय दौर्‍यादरम्यान, डर्बन कसोटीत व्यंकटेश प्रसादने दोन्ही डावांत पाच विकेट्स घेऊन भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. सौजन्य- (ट्वीटर)

  • 7/12

    दक्षिण आफ्रिकेच्या केपलर वेसेल्सने कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत शतके झळकावून अमिट छाप सोडली आणि दोन्ही देशांमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला. सौजन्य- (ट्वीटर)

  • 8/12

    सचिन तेंडुलकरला २००१ मध्ये बॉल टॅम्परिंगच्या वादाला सामोरे जावे लागले. सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांच्याबरोबर, पोर्ट एलिझाबेथ येथील कसोटीदरम्यान झालेल्या कुप्रसिद्ध घटनेनंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. सौजन्य- (ट्वीटर)

  • 9/12

    अलीकडील फ्रीडम सीरीजमध्ये के.एल. राहुलची वादग्रस्त टिप्पणी खूप गाजली होती. त्याने दक्षिण आफ्रिकेवर आरोप केले आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये जोरदार वादविवाद निर्माण झाला. राहुलच्या या वक्तव्यामुळे केपटाऊनमधील मालिका निर्णायक ठरली. सौजन्य- (ट्वीटर)

  • 10/12

    भारताने २००६-०७ च्या मालिकेदरम्यान दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला कसोटी विजय मिळवला, पहिली कसोटी १२३ धावांनी जिंकली. सौजन्य- (ट्वीटर)

  • 11/12

    विराट कोहलीने २०१७-१८ दक्षिण आफ्रिका मालिकेत शानदार फलंदाजी केली. त्यात त्याने त्याचे प्रभुत्व दाखवले. कोहलीने १८६च्या जबरदस्त सरासरीने ५८८ धावा केल्या आणि क्रिकेट आयकॉन म्हणून तो उदयास आला. सौजन्य- (ट्वीटर)

  • 12/12

    फाफ डू प्लेसिसला पायात खूप गोळे (क्रॅम्पिंग) येत होते. त्यावेळी एम.एस. धोनीने त्याची मदत केली होती. धोनीचे हावभाव पाहण्यासारखे होते. यातून धोनीने सीमेपलीकडे असलेल्या भावनेला अधोरेखित करून खिलाडूवृत्तीचे उत्तम उदाहरण दिले. सौजन्य- (ट्वीटर)

TOPICS
केएल राहुलKL Rahulक्रिकेट दक्षिण आफ्रिकाCricket South Africaटीम इंडियाTeam Indiaभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाIND-vs-SAसचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: Sachin tendulkars double century to k l rahuls on controversial statement top 10 moments from the india vs south africa series avw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.