-
भारतीय भूमीवर सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत पहिले नाव विराट कोहलीचे आहे. कोहलीने 31 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि त्यापैकी 24 सामने जिंकले. (एपी फोटो)
-
आपल्या कसोटी कारकिर्दीत, एमएस धोनीने भारतीय भूमीवर 30 सामन्यांमध्ये कसोटी संघाचे नेतृत्व केले आणि यापैकी टीम इंडियाने 21 सामने जिंकले. कसोटी कर्णधार म्हणून भारतीय भूमीवर सर्वाधिक सामने जिंकणारा धोनी हा दुसरा खेळाडू आहे. (एपी फोटो)
-
भारतीय भूमीवर सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आणि घरच्या मैदानावर 13 सामने जिंकले. (एपी फोटो)
-
भारतामध्ये सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत सौरव गांगुली चौथ्या स्थानावर आहे. मायदेशात सौरव गांगुलीने 21 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 10 सामने जिंकले. (एपी फोटो)
-
रोहित शर्माने आतापर्यंत भारतात 12 कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे आणि त्यापैकी 9 जिंकले आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने चेन्नईत बांगलादेशविरुद्ध नववा विजय मिळवला. मात्र, मायदेशात सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत रोहित शर्मा 5 व्या क्रमांकावर आहे. (एपी फोटो)
मायदेशात सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये रोहित पाचव्या स्थानी, तर पहिल्या क्रमांकावर कोण?
Team India Test Captains : भारतात सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे, तर विराट कोहली आणि एमएस धोनी या स्थानावर आहेत
Web Title: Rohit sharma virat kohli ms dhoni most test win at home by an indian captain vbm