-
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू फलंदाज विराट कोहलीच्या जर्सीचा क्रमांक आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. विराट १८ नंबरची जर्सी परिधान करतो.(Photo- AP)
-
आपल्या दमदार कामगिरीने विराटने जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विराट कोहलीने आपले नाव इतके मोठे केले आहे की आता चाहते त्याला फक्त त्याच्या जर्सी क्रमांकावरूनही ओळखतात. (Photo- Jansatta)
-
पण विराट शिवाय जगभरातील अनेक खेळाडूंनी १८ क्रमांकाची जर्सी घातलेली आहे. कोण आहेत ते खेळाडू, चला तर मग जाणून घेऊ. (Photo- Indian Express)
-
ऑस्ट्रेलियाच्या ॲडम गिलख्रिस्टने १९९६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्याच्या जर्सीचा क्रमांकही १८ होता. (Photo- Shebas/XAccount)
-
इंग्लंडच्या मोईन अलीने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्याने १८ क्रमांकाची जर्सी देखील घातली. (Photo- Worcestershire CCC/XAccount)
-
दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डुप्लेसिसने २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तो १८ क्रमांकाची जर्सी देखील घालत असे. (Photo- Indian Express)
-
न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्याच्या जर्सीचा क्रमांकही १८ होता. (Photo- Indian Express)
-
दरम्यान या यादीत एका महिला खेळाडूचाही समावेश आहे. ती म्हणजे भारतीय महिला स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना. स्मृतीने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून ती १८ क्रमांकाची जर्सी घालते. (Photo- X/BCCI Women)
Virat Kohli Jersey: फक्त विराट कोहलीच नाही तर ‘हे’ दिग्गज क्रिकेटपटूही १८ क्रमांकाची जर्सी परिधान करतात
Virat Kohli Jersey : विराट कोहली शिवाय जगभरातील अनेक खेळाडूंनी १८ क्रमांकाची जर्सी परिधान केलेली आहे.
Web Title: Virat kohli and these cricketers wear jersey number 18 adam gilchrist smriti mandhana trent boult moin ali spl