-
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनल सामन्यात न्यूजीलंडने दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी मात करत प्रथमच जेतेपद पटकावले. (Photo Source : ICC)
-
त्याचबरोबर क्रिकेट जगताला टी-२० विश्वचषकाचा नवा विजेता मिळाला आहे. (Photo Source : ProteasWomenCSA)
-
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या विजेतेपदाचा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. (Photo Source : ICC)
-
दरम्यान ही संपूर्ण टूर्नामेंट लो-स्कोअरिंगमुळेही जास्त चर्चेत राहीली असली तरीही काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. (Photo Source : ICC)
-
आघाडीच्या धावा करणाऱ्यांच्या यादीमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या खेळाडूंमध्ये एका भारतीय फलंदाजाचेही नाव आहे. या स्पर्धेतील मोठी धावसंख्या करणाऱ्या पाच खेळाडूंवर एक नजर टाकुया.(Photo Source : ICC/X)
-
लॉरा वोल्वार्ड (दक्षिण आफ्रिका)
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड २०२४ च्या विश्वचषकामधील सहा सामन्यांत४४.६० च्या सरासरीने २२३ धावा करत आघाडीवर राहिली, यामध्ये तिने एक अर्धशतक केले आहे. (Photo Source : ICC) -
तझमिन ब्रिट्स (दक्षिण आफ्रिका)
वोल्वार्डची जोडीदार तझमिन ब्रिट्सने सहा सामन्यांत ३७.४० च्या सरासरीने १८७ धावा करून स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या आहेत. (Photo Source: Proteas Women/X) -
डॅनियल व्याट-हॉज (इंग्लंड)
इंग्लंडची सलामीवीर डॅनियल व्याट-हॉजने तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या. तिने चार सामन्यांत ५०.३३ च्या सरासरीने १५१ धावा केल्या. (Photo Source: England Cricket/Instagram) -
हरमनप्रीत कौर (भारत)
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. तिने चार सामन्यांमध्ये १५० धावा केल्या,५४ ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे. (Photo Source : ICC) -
सुझी बेट्स (न्यूझीलंड)
न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू सुझी बेट्स ही भारताची कर्णधार हरमनप्रीतच्या बरोबरीने होती. तिने सहा सामन्यांत २५.०० च्या सरासरीने १५० धावा केल्या आहेत. (Photo Source : ICC)
हेही पाहा – अजित पवारांनी यादीऐवजी वाटले थेट एबी फॉर्म, ‘हे’ १७ उमेदवार ठरले नशीबवान!…
ICC Womens T20 World Cup 2024 मध्ये ‘या’ खेळाडूंनी केल्या सर्वाधिक धावा, ‘या’ भारतीय फलंदाजाचेही यादीत नाव!
Leading Run-Scorers In ICC Women’s T20 World Cup 2024 : ही संपूर्ण टूर्नामेंट लो-स्कोअरिंगमुळेही जास्त चर्चेत राहीली असली तरीही काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे.
Web Title: Leading run scorers in icc womens t20 world cup 2024 one indian batter name is in the list see spl