-
एबी डिव्हिलियर्स – १९ षटकार
षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एबी डिव्हिलियर्सचे नाव नाही असे होईल का? २० व्या षटकात त्याने आयपीएलमध्ये ८८ चेंडू खेळले. यामध्ये त्याच्या नावावर १९ षटकार आहेत. (Photo: IPL/Social Media) -
दिनेश कार्तिक – २० षटकार
गेल्या वर्षी आयपीएलमधून निवृत्त झालेला दिनेश कार्तिक डेव्हिड मिलरच्या मागे पडला आहे. कार्तिकने १३६ चेंडू खेळल्यानंतर २० व्या षटकात त्याच्या कारकिर्दीतील २० षटकार मारले. (Photo: IPL/Social Media) -
डेव्हिड मिलर – २१ षटकार
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या शेवटच्या षटकात डेव्हिड मिलरने दोन षटकार मारले. अशाप्रकारे, २० व्या षटकात त्याने १०६ चेंडूत २१ षटकार मारले आहेत. (Photo: IPL/Social Media) -
रोहित शर्मा – २३ षटकार
६ वेळा आयपीएल जिंकणाऱ्या रोहित शमनि २० व्या षटकात २३ षटकार मारले आहेत. त्याने डावाच्या शेवटच्या षटकात आतापर्यंत फक्त ९१ चेंडूंचा सामना केला आहे. (Photo: IPL/Social Media) -
हार्दिक पांड्या – २८ षटकार
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या हा आयपीएलमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. त्याने ११७ चेंडू खेळल्यानंतर २० व्या षटकात २८ षटकार मारले आहेत. (Photo: IPL/Social Media) -
रवींद्र जडेजा – ३० षटकार
राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा रवींद्र जडेजा आता सीएसकेकडून खेळतो. त्याने २० व्या षटकात १८१ चेंडूत ३० षटकार मारले आहेत. (Photo: IPL/Social Media) -
किरॉन पोलार्ड – ३३ षटकार
या यादीत मुंबई इंडियन्सचा माजी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डने १८९ चेंडू खेळल्यानंतर २० व्या षटकात ३३ षटकार मारले आहेत. (Photo: IPL/Social Media) -
महेंद्रसिंग धोनी – ६९ षटकार
आयपीएल सामन्याच्या २० व्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. त्याने ३३० चेंडूंचा सामना करत २० व्या षटकात ६९ षटकार मारले आहेत. (Photo: IPL/Social Media)
हिटमॅन रोहित, पांड्या की थाला? आयपीएलमध्ये २० व्या षटकात सर्वाधिक षटकार कोणाच्या नावावर?
राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा रवींद्र जडेजा आता सीएसकेकडून खेळतो. त्याने २० व्या षटकात १८१ चेंडूत ३० षटकार मारले आहेत.
Web Title: Batsmen who hit the most sixes in the 20th over in ipl ms dhoni ipl 2025 spl