-
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने वेस्ट इंडिजविरुद्ध फक्त १६ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकलं होतं, हा सामना १८ जानेवारी २०१५ या दिवशी जोहान्सबर्गमध्ये खेळला गेला होता. डिव्हिलियर्सने या सामन्यात ४४ चेंडूत १४९ धावा करताना हा जबरदस्त विक्रम केला होता. आतापर्यंत हा त्याचा विक्रम कोणीही मोडू शकलेलं नाही. (Photo: Indian Express)
-
दरम्यान वेस्ट इंडिजच्या मॅथ्यू फोर्डने आयर्लंडविरुद्ध डब्लिनमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १६ चेंडूत अर्धशतक ठोकून एबी डिव्हिलियर्सच्या सर्वात जलद एकदिवसीय अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. फोर्डने १९ चेंडूत ५८ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने दोन चौकार आणि आठ षटकार ठोकले आहेत. हा सामना काल २३ मे २०२५ रोजी खेळला गेला. दरम्यान, याचनिमित्तानं आपण जाणून घेऊयात टॉप १० सर्वात जलद एकदिवसीय अर्धशतकांचे विक्रम कोणाच्या नावावर आहेत आणि ते किती चेंडूंमध्ये केले गेले आहेत? (Photo: Espncricinfo)
-
सनथ जयसूर्या
श्रीलंकेचा फलंदाज सनथ जयसूर्याने पाकिस्तानविरुद्ध 17 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं हा एकदिवसीय सामना सिंगापूरमध्ये ०७ एप्रिल १९९६ रोजी खेळला गेला होता. (Photo: Indian Express) -
कुसल परेरा
श्रीलंकेचा फलंदाज कुसल परेराने पाकिस्तान 17 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. १५ जुलै २०१५ रोजी हा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले मैदानावर खेळला गेला होता. (Photo: Indian Express) -
मार्टिन गुप्टिल, न्यूझीलंड
१७ चेंडूत अर्धशतक, विरूद्ध: श्रीलंका, ठिकाण: क्राइस्टचर्च, सामना दिनांक: २८ डिसेंबर २०१५ (Photo: Indian Express) -
लियाम लिव्हिंगस्टोन, इंग्लंड
१७ चेंडूत अर्धशतक, विरुद्ध: नेदरलँड्स, ठिकाण: अॅमस्टेलवीन, सामना दिनांक: १७ जून २०२२ (Photo: Indian Express) -
एसपी ओडोनेल, ऑस्ट्रेलिया
१८ चेंडूत अर्धशतक, विरुद्ध: श्रीलंका, ठिकाण: शारजाह, सामना दिनांक: ०२ मे १९९० (Photo: Espncricinfo) -
शाहिद आफ्रिदी पाकिस्तान
१८ चेंडूत अर्धशतक, विरुद्ध: श्रीलंका, ठिकाण: नैरोबी, सामना दिनांक: ०४ ऑक्टोबर १९९६ (Photo: Indian Express) -
शाहिद आफ्रिदी पाकिस्तान
१८ चेंडूत अर्धशतक, विरुद्ध: नेदरलँड्स, ठिकाण: कोलंबो, सामना दिनांक: २१ सप्टेंबर २००२ (Photo: Indian Express) -
ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलिया
१८ चेंडूत अर्धशतक, विरुद्ध: भारत, ठिकाण: बंगळुरू, सामना दिनांक: ०२ नोव्हेंबर २०१३ (Photo: Indian Express) -
शाहिद आफ्रिदी, पाकिस्तान
१८ चेंडूत अर्धशतक, विरुद्ध: बांगलादेश, ठिकाण: मिरपूर, सामना दिनांक: ०४ मार्च २०१४ (Photo: Indian Express) -
दरम्यान, आतापर्यंत ७५ खेळाडूंनी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद अर्धशतकांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यामधील भारतीय खेळाडूंबद्दल सांगायचे झाल्यास माजी खेळाडू अजित आगरकर यांनी २१ धावांमध्ये सर्वात जलद अर्धशतक झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात केले होते. हा सामना राजकोटमध्ये १४ डिसेंबर २००० या दिवशी खेळला गेला होता. (Photo: Indian Express)
-
त्यांच्या खालोखाल कपिल देव यांनी २२ चेंडूंमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध बर्बिसमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकले होते, हा सामना २९ मार्च १९८३ मध्ये खेळला गेला होता. (Photo: Indian Express)
-
विरेंद्र सेहवागने २२ चेंडूत केनिया विरूद्ध, राहूल द्रविड २२ चेंडूत न्यूझीलंडविरूद्ध , युवराज सिंग २२ चेंडूत बांगलादेशविरुद्ध सर्वात जलद अर्धशतके ठोकली आहेत. (Photo: Indian Express)
एकदिवसीय सामन्यांत सर्वात जलद अर्धशतकं ठोकणारे टॉप १० खेळाडू! भारतीय खेळाडूंची कशी आहे कामगिरी?
वेस्ट इंडिजच्या मॅथ्यू फोर्डने आयर्लंडविरुद्ध डब्लिनमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १६ चेंडूत अर्धशतक ठोकून एबी डिव्हिलियर्सच्या सर्वात जलद एकदिवसीय अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. जाणून घेऊयात टॉप १० सर्वात जलद एकदिवसीय अर्धशतकांचे विक्रम.
Web Title: Top 10 fastest fastest fifty in odi know about indian players records matthew forde ab de villiers ajit agarkar kapil dev rahul dravid spl