-
Pm Modi Meets Vaibhav Suryavanshi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पाटणा विमानतळावर 14 वर्षीय युवा स्टार क्रिकेटर वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या एक्स हँडलवर ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैभव सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. (Photo: Narendra Modi/X)
-
या फोटोंच्या कॅप्शनमध्ये पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, ते पाटणा विमानतळावर युवा क्रिकेट सेन्सेशन वैभव सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबाला भेटलो. त्याच्या क्रिकेट कौशल्याचे देशभर कौतुक होत आहे. त्याच्या उज्वल भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा. (Photo: Narendra Modi/X)
-
पीएम मोदींनी केले वैभव सूर्यवंशीचे कौतुक – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीही वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले आहे. रविवार, ४ मे रोजी बिहारमध्ये खेलो इंडिया युथ गेम्स सुरू होत असल्याची घोषणा करताना ते म्हणाले, “मी आयपीएलमध्ये बिहारचा मुलगा वैभव सूर्यवंशीची चमकदार कामगिरी पाहिली. वैभवने इतक्या लहान वयात इतका मोठा विक्रम रचला. वैभवाच्या प्रदर्शनामागे कठोर परिश्रम दडलेले आहेत.” (Photo: Narendra Modi/X)
-
वैभव सूर्यवंशी हा बिहारच्या समस्तीपूरचा रहिवासी आहे बिहारच्या समस्तीपूरचा रहिवासी वैभव सूर्यवंशी हा आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग आहे. (Photo: Social Media)
-
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ३५ चेंडूत शतक ठोकून खळबळ उडवून दिली होती. (Photo: Social Media)
-
आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. याबाबतीत ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. ख्रिस गेलने ३० चेंडूत शतक ठोकले होते. या कामगिरीनंतर, वैभव सूर्यवंशीचे चाहते जगभरात वाढले आहेत. (Photo: Social Media)
-
वैभव आयपीएलच्या इतिहासात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडूही बनला आहे. त्याने १४ वर्षे आणि ३२ दिवसांच्या वयात शतक ठोकले. (Photo: Social Media)
-
वैभवने आयपीएल २०२५ मध्ये एकूण २५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ३६.०० च्या सरासरीने २५२ धावा केल्या आहेत. (Photo: Social Media)
-
त्याचा स्ट्राईक रेट २०६.५५ आहे. त्याने १८ चौकार आणि २४ षटकार मारले आहेत. हेही पाहा- जितेश शर्माच्या प्रेमाची गोष्ट; मराठी मुलीबरोबर लग्न, काय करते पत्नी? जाणून घ्या…
वैभव सूर्यवंशीने घेतले पंतप्रधानांचे आशीर्वाद; पीएम नरेंद्र मोदी आणि वैभव सूर्यवंशीच्या कुटुंबियांच्या भेटीचे फोटो व्हायरल…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पाटणा विमानतळावर १४ वर्षीय तरुण स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या कुटुंबाची भेट घेतली.
Web Title: Pm modi meets ipl sensation vaibhav suryavanshi and his family at patna airport spl