-
ऋषभ पंत
इंग्लंडविरुद्ध लीड्समध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने दोन्ही डावात शतके झळकावली. पंतने पहिल्या डावात १३४ आणि दुसऱ्या डावात ११८ धावा केल्या. पंतआधीही भारताच्या कोणत्या खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे ते जाणून घेऊयात… (Photo: ICC/Social Media) -
विजय हजारे
सर्वप्रथम, भारताचे दिग्गज फलंदाज विजय हजारे यांनी कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावली. (Photo: ICC/Social Media) -
१९४८
१९४८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये त्यांनी ११६ धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात १४६ धावा ठोकल्या होत्या. (Photo: ICC/Social Media) -
सुनील गावस्कर
विजय हजारे यांच्यानंतर सुनील गावस्कर यांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १२४ आणि २२० धावांच्या खेळी केल्या. (Photo: ICC/Social Media) -
तीन वेळा केला आहे पराक्रम
गावस्कर यांनी दोन्ही डावात तीन वेळा शतके झळकावली आहेत. १९७१ व्यतिरिक्त, त्यांनी १९७८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध १११ आणि १३७ धावा आणि वेस्ट इंडिजविरुद्ध १०७ आणि १८२ धावा केल्या आहेत. (Photo: ICC/Social Media) -
राहुल द्रविड
गावस्कर यांच्यानंतर राहुल द्रविडने कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावले आहेत. त्यानेही हा पराक्रम दोनदा केला आहे. (Photo: ICC/Social Media) -
दोनदा केला पराक्रम
१९९९ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात राहुल द्रविडने पहिल्या डावात १९० आणि दुसऱ्या डावात नाबाद १०३ धावा केल्या. त्यानंतर २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने ११० आणि १३५ धावा केल्या. (Photo: ICC/Social Media) -
विराट कोहली
कर्णधार झाल्यानंतर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने पहिल्या डावात ११५ आणि दुसऱ्या डावात १४१ धावा केल्या. (Photo: ICC/Social Media) -
अजिंक्य रहाणे
या यादीत माजी भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेचाही समावेश आहे. २०१५ मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात १२७ आणि दुसऱ्या डावात १०० धावा केल्या होत्या. (Photo: ICC/Social Media) -
रोहित शर्मा
या यादीत रोहित शर्माचाही समावेश आहे. २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने १७६ आणि दुसऱ्या डावात १२७ धावा केल्या होत्या. (Photo: ICC/Social Media) हेही पाहा- KL Rahul Net Worth: आलिशान घर ते महागड्या गाड्या; लीड्सच्या मैदानावर शतक झळकावणारा केएल राहुल किती संपत्तीचा मालक?
कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावणारे ७ भारतीय फलंदाज; एकाने तर तीन वेळा केली आहे ही कामगिरी
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध लीड्समध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने दोन्ही डावात शतके झळकावली. पंतआधीही भारताच्या कोणत्या खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे ते जाणून घेऊयात..
Web Title: 7 indian batsmen who scored centuries in both innings of a test match ind vs eng test 2025 rishabh pant spl