-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी नवीन नियुक्त्या केल्या केल्या आहेत.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली आहे.
-
इतरही काही नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती केली आहे.
-
दरम्यान, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याकडे कोणतीच नवीन जबाबदारी दिली नाही.
-
सुप्रिया सुळेंची कार्यकारी अध्यक्षपदी निवड केल्याने अजित पवार नाराज असल्याच्या चर्चाही सुरू आहे. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.
-
कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळेंची नियुक्ती करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला आहे- अजित पवार
-
या निर्णयामुळे मी अतिशय समाधानी आहे. मला फक्त महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे- अजित पवार
-
माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे. मी ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतोय- अजित पवार
-
राज्य पातळीवरचे प्रश्न मला विचारा आणि राष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न तुम्ही आमचे राष्ट्रीय प्रवक्ते किंवा राष्ट्रीय नेत्यांना विचारा, असं मी नेहमीच सांगत आलो आहे- अजित पवार
-
आम्ही एक समिती गठीत केली होती. त्या समितीत १५ ते १७ लोक होते. त्यावेळी आम्ही दोन निर्णय घेतले होते- अजित पवार
-
पहिला निर्णय म्हणजे शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा- अजित पवार
-
दुसरा निर्णय म्हणजे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंची नियुक्ती करावी, हे मी स्वत: सुचवलं होतं-अजित पवार
“मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस, सुप्रिया सुळेंची नियुक्ती…”, अजित पवारांचं थेट विधान, नेमकं काय म्हणाले?
सुप्रिया सुळेंची कार्यकारी अध्यक्षपदी निवड केल्याने अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.
Web Title: Ajit pawar statement on supriya sule appointment as working president sharad pawar rmm