-
शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यातील गुप्त भेटीनंतर महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला आहे.
-
काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून शरद पवारांशिवाय निवडणूक लढण्याची चाचपणी केली जात आहे.
-
दरम्यान, एका इंग्रजी वर्तमान पत्राने एका मंत्र्याच्या हवाल्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
-
शरद पवार महायुतीत आले तर शरद पवारांना कृषीमंत्री आणि सुप्रिया सुळेंना केंद्रीय मंत्रीपद आणि जयंत पाटलांना राज्यात मंत्रीपदाची ऑफर भाजपाकडून देण्यात आली आहे, अशी बातमी संबंधित वृत्तपत्राने दिली.
-
भाजपाने दिलेल्या कथित ऑफरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
भाजपाने दिलेल्या ऑफरबद्दल चर्चा झाली किंवा नाही झाली? हे मला सांगता येणार नाही. वर्तमानपत्रात बातमी छापून आली म्हणून हे खरं आहे, असं समजून चालणार नाही- रोहित पवार
-
समजा भाजपाने दिलेली ऑफर खरीही असेल, पण महाराष्ट्रातील तमाम जनतेनं हेच समजून घेतलं पाहिजे की, शरद पवारांना पदाची ऑफर असूनही त्यांनी महाराष्ट्राचा धर्म स्वीकारला आहे- रोहित पवार
-
शरद पवारांनी संघर्ष स्वीकारला आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार स्वीकारला आहे. संघर्ष करत ते महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे- रोहित पवार
-
त्यामुळे कोण काय बोलतंय आणि कोण काय छापतंय, याकडे लक्ष देण्यापेक्षा आता आपल्याला संघर्ष करायचा आहे, हेच सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे- रोहित पवार
भाजपाकडून शरद पवारांना कृषी तर सुप्रिया सुळेंना केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर? रोहित पवार म्हणाले…
शरद पवार महायुतीत सामील झाले तर शरद पवारांना कृषीमंत्री आणि सुप्रिया सुळेंना केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर भाजपाने दिल्याची चर्चा आहे.
Web Title: Rohit pawar statement on bjp offers sharad pawar agriculture minister post and supriya sule central minister rmm