• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. irctc photos five most beautiful indian railway routes you must visit 5 wonderful train journey route in india that are worth taking sjr

Indian Railway : भारतातील ‘हे’ ५ सुंदर रेल्वे मार्ग, जे पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Best Train Routes in India : भारतातील पाच सर्वांत सुंदर रेल्वेमार्गांबद्दल जाणून घेणार आहोत; जिथे तुम्ही आयुष्यात एकदा तरी भेट दिलीच पाहिजे

Updated: December 26, 2023 10:05 IST
Follow Us
  • five most beautiful indian railway routes you must visit 5 wonderful train journey route in india that are worth taking
    1/9

    आज जगातील सर्वात लांब रेल्वे नेटवर्कमध्ये भारतील रेल्वे चौथ्या क्रमांकावर आहोत. भारताच्या रेल्वे नेटवर्कमध्ये काही रेल्वे मार्गांचा समावेश आहे जिथून ट्रेन जाताच हिरवेगार सुंदर जंगल, उंचच- उंच पर्वतरांगा भुरळ घालतात, तर पक्षांची किलबिलाट शिवाय वाहते धबधबे, नदीच्या पाण्याची झुळझुळ कानी पडते मिळते. (photo – @EasternRailway twitter)

  • 2/9

    एकूणच काय तर या रेल्वे मार्गांवर प्रवास करणे म्हणजे पृथ्वीवर राहून स्वर्गीय आनंद घेतल्यासारखा वाटतो. त्यामुळे आज आपण भारतातील पाच सर्वांत सुंदर रेल्वेमार्गांबद्दल जाणून घेणार आहोत; जिथे तुम्ही आयुष्यात एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. (photo – @GoHimachal_ twitter)

  • कोकण रेल्वे कोकण रेल्वेमार्गावर संपूर्ण प्रवासात तुम्ही अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य अनुभवू शकता. हा रेल्वेमार्ग कोकण किनार्‍यावरून जातो. त्यामुळे मुंबई ते गोवा येईपर्यंत तुम्हाला अरबी समुद्र आणि पश्चिम घाटाचे इतके सुंदर व विलोभनीय दृश्य पाहायला मिळते की, जे तुम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही. (photo – @EasternRailway twitter)
  • 3/9

    हिरवेगार जंगल, सुंदर नद्यांमधून जाणारा या रेल्वे मार्गात तुम्हाला मोठमोठ्या पर्वतरांगा, अनेक आश्चर्यकारक वळणे, नदीचे पूल, तलाव व धबधबे असे निसर्गाच्या सुंदर ठेव्यांचे दर्शन घडते. (photo creadit – National Train Enquiry System)

  • 4/9

    दार्जिलिंग हिमालयन रेल्वे (नवीन जलपाईगुडी-दार्जिलिंग) युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या या नॅरोगेज रेल्वे ट्रॅकवरून प्रवास करताना भान हरपून जायला होते. या सुंदर राइडचा आनंद घेण्यासाठी जगातील विविध भागांतून लोक दार्जिलिंगमध्ये येतात. ही टॉय ट्रेन सुंदर पर्वतांमधून जाते; जिथे कांचनजंगा पर्वताची अद्भुत दृश्ये पाहता येतात. चहाच्या बागा पाहण्याची सुंदर संधी मिळते. ( संग्रहित फोटो)

  • 5/9

    हिमालयीन राणी (कालका-शिमला) कालका ते शिमला हा रेल्वेमार्ग तुम्हाला सर्वांग सुंदर प्रवासाची अनुभूती देईल. हा अविश्वसनीय प्रवास सुमारे पाच तास चालतो. या रेल्वेमार्गावरून प्रवास करताना सुंदर, अविस्मरणीय असे निसर्गसौंदर्य अनुभवण्यास मिळते. या मार्गावर सुंदर दऱ्या आणि हिरवीगार जंगले असल्याने पर्यटकांना कालका-शिमला हा रेल्वेमार्ग नेहमीच भुरळ घालतो. (photo – financial express)

  • 6/9

    कांगडा व्हॅली रेल्वे (पठाणकोट-जोगिंदरनगर) कांगडा व्हॅली रेल्वे भारतातील सर्वोत्तम रेल्वेपैकी एक असू शकते. या मार्गावरून प्रवास केल्यावर तुम्हाला धौलाधर पर्वतराजीचे सुंदर दृश्य अनुभवण्याची संधी मिळेल. भारतातील या सर्वांत सुंदर रेल्वेमार्गावर तुम्ही एकदा तरी प्रवास केलाच पाहिजे.(photo – wikipedia)

  • वाळवंटातील राणी (जैसलमेर-जोधपूर) भारतातील प्रत्येक शहराची आणि राज्याची स्वतःची अशी वेगळी ओळख आणि सौंदर्य आहे. त्याचप्रमाणे जैसलमेर ते जोधपूरची ओळख आहे, याशिवाय येथील रेल्वेमार्ग ही तितकाच प्रसिद्ध आहे.(photo – Rakesh Sharma Bikaner youtube)
  • 7/9

    जिथे तुम्हाला ओसाड वाळवंट जमीन, वाळूचे ढिगारे, वाळवंटातील वन्यजीव आणि आदिवासींचे सुंदर दृश्य पाहायला मिळेल. हा रेल्वेमार्ग राजस्थानच्या थार वाळवंटातील कोरड्या जंगलातून आणि ओसाड जमिनीतून जातो. (PHOTO – @meinbhiphotographer instagram)

TOPICS
आयआरसीटीसीIRCTCकोकण रेल्वेKonkan Railwayभारतीय रेल्वेIndian Railwayमराठी बातम्याMarathi Newsरेल्वेRailwayरेल्वे विभागRailway Departmentरेल्वे स्टेशनRailway Station

Web Title: Irctc photos five most beautiful indian railway routes you must visit 5 wonderful train journey route in india that are worth taking sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.