• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ratan tata dies live update how much of tata is owned by ratan tata how big is tata group from salt tea to planes what does tata make sjr

Tata Companies List : मिठापासून विमानापर्यंत, ‘या’ कंपन्या आहेत टाटा समूहाच्या मालकीच्या

Tata Group Companies List : रतन टाटा यांच्या टाटा समुहाच्या मालकीच्या कंपन्या कोणत्या जाणून घेऊ..

Updated: October 10, 2024 11:54 IST
Follow Us
  • Ratan Tata dies live update How much of Tata is owned by Ratan Tata how big is tata group from salt tea to planes what does tata make
    1/12

    Ratan Tata Death News : भारतातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे आज निधन झाले.मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांचे नाव भारतीय इतिहास सुवर्णक्षरांनी लिहिले जाईल, कारण रतन टाटा हे जेवढे मोठे उद्योगपती होते तेवढेच ते एक महान समाजसेवकही होते.

  • 2/12

    टाटा समूहाला मोठ्या उंचीवर नेण्यात रतन टाटा यांची सर्वात मोठी भूमिका होती.आज तुम्ही जमिनीपासून आकाशापर्यंत जिकडे पाहाल तिथे तुम्हाला टाटाचे काही ना काही उत्पादन नक्कीच पाहायला मिळेल.यात अगदी तुमच्या घरात आणलेल्या मिठापासून ते विमानापर्यंत अनेक उत्पादक कंपन्या आज टाटा समूहाच्या मालकीच्या आहेत.

  • 3/12

    देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाच्या १०० हून अधिक कंपन्या आहेत आणि टाटाचा व्यवसाय जवळपास प्रत्येक क्षेत्रात विस्तारलेला आहे. टाटांनी चहा, मीठ, पाणी, सोने, कारपासून ते विमानांपर्यंत सर्वत्र आपला व्यवसाय पसरवला आहे.

  • 4/12

    देशात क्वचितच असे कोणते घर असेल जिथे टाटाची एकही वस्तू नसेल.पण टाटा समूह नेमकं कोण-कोणत्या क्षेत्रात काम करत आहे जाणून घेऊ..

  • 5/12

    टाटा समूह कंज्यूमर एंड रिटेल सेक्टरमध्ये चहा, मीठ ते दागिनेपर्यंत अनेक गोष्टी विकतो.ज्यात टाटा केमिकल्स, व्होल्टास, टायटन, क्रोमा ब्रँड, ज्युडिओ, तनिष्क ज्वेलरी, टाटा सॉल्ट, दाल मसाले इत्यादी, टाटा टी, टाटा सॉल्ट, टाटा संपन ब्रँड मसाले, घड्याळे इत्यादींसह अनेक गोष्टींचा समावेश आहे.

  • 6/12

    टाटा समूहाची आयटी सेक्टरमधील देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS). ही कंपनी केवळ भारतातच नाही तर जगातील इतर अनेक देशांमध्ये विस्तारली आहे.

  • 7/12

    याशिवाय Tata Elxsi ही डिझाइन आणि टेक्नॉलॉजी पुरवणाऱ्या जगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये सामील आहे.

  • 8/12

    टाटा समूहाने १९०३ मध्ये ताजमहाल हॉटेलची स्थापना केल्यापासून ते ट्रॅव्हल,हॉस्पिटॅलिटी आणि टूरिझ्म सेक्टरमध्येही सक्रिय आहेत. इंडियन हॉटेल्स कंपनी (IHCL) आणि एअर इंडिया एअरलाइन्स देखील टाटाच्या मालकीच्या आहेत.

  • 9/12

    टाटा ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्येही खूप प्रसिद्ध आहे.टाटा मोटर्स केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे.सर्व सामान्यांना परवडणाऱ्या नॅनो कारपासून ते जग्वार आणि लँड रोव्हरसारखी अनेक महागडी वाहन आज टाटा मोटर्सच्या अखत्यारीत येतात.

  • 10/12

    टेलिकॉम आणि मीडिया सेक्टरमध्ये टाटा कम्युनिकेशन्स, टाटा स्काय आणि टाटा टेलिसर्व्हिसेस अशा टाटाच्या कंपन्या कार्यरत आहेत.

  • 11/12

    याशिवाय ट्रेडिंग आणि इन्वेस्टमेंट सेक्टरमध्ये टाटा इंटरनॅशनल, टाटा इंडस्ट्रीज आणि एनबीएफएस टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्प या कंपन्या सक्रिय आहेत. टाटा विमा क्षेत्रातही सक्रिय आहे.

  • 12/12

    स्टील आणि इन्फ्रास्ट्रक्टर सेक्टरमध्येही टाटांचा दबदबा कमी नाही. याशिवाय टाटा पॉवर, टाटा हाऊसिंग, टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स, टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रातही टाटा समूह काम करत आहे. (सर्व फोटो – indian express , financial express, PTI)

TOPICS
गुगल ट्रेंडGoogle Trendटाटा समूहTATA Groupट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending Newsमराठी बातम्याMarathi Newsमुंबई न्यूजMumbai Newsव्हायरल न्यूजViral Newsसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Ratan tata dies live update how much of tata is owned by ratan tata how big is tata group from salt tea to planes what does tata make sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.