• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. alice treadwell the first woman contractor to execute a railway project in india spl

मुंबई- पुणे हा रेल्वे मार्ग बांधून ‘या’ महिलेने भारतातील पहिली महिला रेल्वे कंत्राटदार म्हणून इतिहास रचला होता…

First Woman Railway Contractor in India: भारतातील रेल्वेच्या विस्ताराचा इतिहास अनेक साहसी कथांनी भरलेला आहे, परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की या क्षेत्रात एका महिलेनेही महत्त्वाचे योगदान दिले. या महिलेबद्दल जाणून घेऊया.

March 1, 2025 13:13 IST
Follow Us
  • History of Mumbai-Pune railway
    1/11

    जेव्हा आपण भारतातील रेल्वेच्या इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला अनेकदा ब्रिटिश अभियंते आणि कंपन्यांची भूमिका आठवते. पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील रेल्वे लाईन बांधणीत योगदान देणारी पहिली महिला कोण होती?
    (छायाचित्र स्रोत: @indian_railways_lovers/instagram)

  • 2/11

    एलिस ट्रेडवेल या ब्रिटिश महिलेने या क्षेत्रात इतिहास रचला. त्यांनी १८६३ मध्ये मुंबई-पुणे रेल्वे मार्गाचे बांधकाम पूर्ण केले आणि भारतीय रेल्वे बांधकामात आपली अमिट छाप सोडली. (फोटो: अ‍ॅलिस ट्रेडवेल)

  • 3/11

    १९ व्या शतकाच्या मध्यात, जेव्हा महिलांनी कोणत्याही बांधकाम कामात सहभागी होणे दुर्मिळ होते, तेव्हा अ‍ॅलिस ट्रेडवेलने त्यांच्या कठोर परिश्रम आणि दूरदृष्टीने मुंबई-पुणे रेल्वे मार्ग बांधून इतिहास रचला. (फोटो: अ‍ॅलिस ट्रेडवेल)

  • 4/11

    अ‍ॅलिस ट्रेडवेल कोण होत्या?
    अ‍ॅलिस ट्रेडवेल यांचा जन्म १८२३ मध्ये इंग्लंडमधील स्टॅफोर्डशायरमधील लीक येथे झाला. १८४६ मध्ये त्यांचा विवाह रेल्वे कंत्राटदार सोलोमन ट्रेडवेल यांच्याशी झाला. १८५९ मध्ये, जेव्हा ब्रिटीश सरकारने त्यांना भोर घाट विभागाच्या बांधकामाचे कंत्राट दिले, तेव्हा अॅलिस आणि तिचे पती सोलोमन भारतात आले. (फोटो: अ‍ॅलिस ट्रेडवेल)

  • 5/11

    कशा बनल्या पहिल्या महिला रेल्वे कंत्राटदार?
    दुर्दैवाने, भारतात आल्यानंतर लगेचच सोलोमन ट्रेडवेल यांचा अतिसार किंवा कॉलरामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पतीचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची जबाबदारी अॅलिसवर आली. त्यांनी असाधारण संयम, नेतृत्व आणि निर्णय घेण्याची क्षमता दाखवली आणि हे आव्हान स्वीकारले. (फोटो: अ‍ॅलिस ट्रेडवेल)

  • 6/11

    एलिस यांनी रेल्वे अभियंते स्वान्स्टन अॅडमसन आणि जॉर्ज लुई क्लोझर यांच्या मदतीने हे बांधकाम पूर्ण केले. (फोटो: अ‍ॅलिस ट्रेडवेल)

  • 7/11

    भोर घाट रेल्वे मार्ग: एक कठीण प्रकल्प
    भोर घाट विभाग हा मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान असलेल्या खंडाळा आणि पळसदरी दरम्यानचा एक डोंगराळ रेल्वे मार्ग होता. या ठिकाणी रेल्वे ट्रॅक बांधणे अत्यंत कठीण होते कारण ते एक दुर्गम डोंगराळ क्षेत्र होते. (फोटो: अ‍ॅलिस ट्रेडवेल)

  • 8/11

    रेल्वे लाईनसाठी डोंगर तोडावे लागले, जे त्या काळातील साधने आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप कठीण होते. भयानक हवामान परिस्थिती आणि आजारांमुळे अनेक कामगारांचा मृत्यू झाला. हा एक अत्यंत धोकादायक प्रकल्प होता, ज्यामध्ये अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. (फोटो: अ‍ॅलिस ट्रेडवेल)

  • 9/11

    या प्रकल्पावर हजारो कामगारांनी काम केले आणि हे बांधकाम काम मानवी संसाधने आणि तांत्रिक आव्हानांनी भरलेले होते. अखेर, १८६३ मध्ये ही रेल्वे लाईन पूर्ण झाली आणि ती भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक मोठी कामगिरी ठरली. (फोटो: अ‍ॅलिस ट्रेडवेल)

  • 10/11

    अ‍ॅलिस ट्रेडवेल: एक स्त्री, अनेक भूमिका
    रेल्वे कंत्राटदार असण्यासोबतच, अ‍ॅलिस ट्रेडवेल एक छायाचित्रकार देखील होत्या. त्यांनी भोर घाटाच्या कठीण भौगोलिक भूभागाचे आणि रेल्वे बांधकामातील महत्त्वाचे छायाचित्रे टिपली, त्या काळातील तांत्रिक आणि मानवी श्रमिकासमोरील आव्हाने या फोटोंमधून आजही अनुभवता येतात. (फोटो: अ‍ॅलिस ट्रेडवेल)

  • 11/11

    अ‍ॅलिस ट्रेडवेलचे जीवन आणि वारसा
    १८६० मध्ये अ‍ॅलिस इंग्लंडला परतल्या, जिथे त्यांना पतीकडून ७०,००० पौंडची संपत्ती वारशाने मिळाली. त्यांची एकुलती एक मुलगी, अॅलिस मार्था एलिझाबेथ, हिचे लग्न १८६६ मध्ये झाले. तर एलिस ट्रेडवेल यांचे १४ जून १८६७ रोजी आयल ऑफ वाईट येथील रायड येथे निधन झाले. (फोटो: अ‍ॅलिस ट्रेडवेल)
    हेही पाहा- बक्सर ते गया; जाणून घ्या बिहारमधील प्रमुख १० शहरांच्या नावांमागील रंजक गोष्टी…

TOPICS
ट्रेंडिंगTrendingपुणेPuneभारतीय रेल्वेIndian Railwayमराठी बातम्याMarathi NewsमहिलाWomanमुंबईMumbaiरेल्वेRailway

Web Title: Alice treadwell the first woman contractor to execute a railway project in india spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.