-
आजघडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भारतातलेच नाही तर जगातले सर्वात प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जात आहेत. दरम्यान, त्यांच्या आयुष्यातील असे अनेक छायाचित्रे आहेत जी कदाचित फार कमी लोकांना पाहायला मिळाली असतील. (Photo Source: @modiarchive/X)
-
पीएम मोदींच्या या दुर्मिळ आणि कधीही न पाहिलेल्या छायाचित्रांमध्ये त्यांचा संघर्ष, संघटनात्मक कौशल्य आणि देशभक्ती स्पष्टपणे दिसून येते. (Photo Source: @modiarchive/X)
-
नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन (२००३, कोइम्बतूर)
गुजरातचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी मोदी राष्ट्रीय राजकारणात एक मजबूत ठसा उमटवत होते. हा फोटो तेव्हाचा आहे. १ ऑगस्ट २००३ रोजी कोइम्बतूर (तामिळनाडू) येथे नरेंद्र मोदी उपराष्ट्रपची सी.पी. राधाकृष्णन यांची भेट झाली होती. जे अलीकडेच भारताचे १५ वे उपराष्ट्रपती झाले आहेत. (Photo Source: @modiarchive/X) -
लंडन भेट आणि दहशतवादावर वक्तव्य (२०००)
२००० साली सप्टेंबर मध्ये, नरेंद्र मोदी लंडनमध्ये पोहोचले होते आणि त्यांनी ब्रिटेनचे उपपंतप्रधान जॉन प्रेस्कॉट यांची भेट घेतली होती. त्यावेळी मोदी म्हणाले होते की “दहशतवाद हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे.” मोंदींनी हे वक्तव्य ९/११ च्या फक्त एका वर्षा आधी केले होते, तेव्हा जगाने दहशतवादाला जागतिक धोका म्हणून गांभीर्याने घेण्यास सुरुवातही केली नव्हती. (Photo Source: @modiarchive/X) -
‘जनता राजा’ (२००६)
गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी कर्णावती क्लबमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “जनता राजा” या नाटकाला उपस्थिती दर्शवली होती. (Photo Source: @modiarchive/X) -
वीर सावरकरांच्या कोठडीत
नरेंद्र मोदी यांनी अंदमानच्या भेटीदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीला भेट दिली. हा फोटो त्यांच्या देशभक्ती आणि स्वातंत्र्यसैनिकांबद्दलच्या आदराची साक्ष देतो. (Photo Source: @modiarchive/X) -
मॉरिशस गंगा तलाव (१९९८)
मोदींनी मॉरिशसमधील ग्रँड बेसिन (गंगा तलावा)ला भेट दिली होती. हा मोदींच्या आयुष्यातील एक भावनिक क्षण होता. (Photo Source: @modiarchive/X) -
लंडन – अनियोजित दौरा (१९९३)
१९९३ अमेरिकेहून परतताना, मोदींनी कसलंही नियोजन नसताना अचानक ब्रिटनला भेट दिली. तिथे त्यांनी भारतीय समुदायाला भेट दिली आणि स्थानिक वृत्तपत्रे आणि रेडिओ चॅनेलशी संवाद साधला. यामुळे परदेशातल्या भारतीयांशी त्यांचे संबंध दृढ झाले. (Photo Source: @modiarchive/X) -
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान (१९८६)
भाजपामधील राजकीय जीवनाच्या सुरूवातीच्या काळापासूनच मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा सन्मान केला. त्यांनी आंबेडकरांच्या विचारसरणीचा आणि योगदानाचा प्रसार करण्यासाठी काम केले. (एका कार्यक्रमातील फोटो) (Photo Source: @modiarchive/X) -
प्राणी
पीएम मोदींचा वाघाबरोबरचा खास दुर्मिळ फोटो (Photo Source: @modiarchive/X) -
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार (१९८४) यांच्यासोबत नरेंद्र मोदींचा हा दुर्मिळ फोटो खूप कमी लोकांनी पाहिला असेल. (Photo Source: @modiarchive/X)
-
जन संपर्क
हरियाणामध्ये काढलेला हा जुना फोटो मोदींचे लोकांशी असलेला दांडगा जनसंपर्क दर्शवितो. मोदींनी तळागाळात काम करत संघटना कशी उभारली हे ते स्पष्ट होते. (Photo Source: @modiarchive/X) -
अमेरिका दौरा (१९९३)
मोदींनी १९९३ मध्ये अमेरिकेचे सरकार आणि राजकीय नेत्यांना भेटण्यासाठी अमेरिकेचा दौरा केला. तिथे त्यांनी जागतिक स्तरावरील राजकारण आणि धोरणांचा अभ्यास केला. हा दौरा त्यांच्या राजकीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनाला आकार देण्यासाठी महत्त्वाचा होता. (Photo Source: @modiarchive/X) -
स्वामी विवेकानंदांची प्रेरणा
स्वामी विवेकानंदांच्या शिकवणींनी प्रेरित होऊन, मोदींनी वयाच्या १७ व्या वर्षी हिमालयाच्या प्रवासाला सुरुवात केली. हा फोटो त्यांच्या आयुष्यातील त्या वळणाचे चित्र स्पष्ट करतो. प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांचा हा फोटो वडनेर गावात झालेल्या एका लग्न समारंभातला आहे. (Photo Source: @modiarchive/X) -
केशुभाई पटेल यांचा शपथविधी समारंभ (१९९५) –
मोदी जमिनीवर बसून शपथविधी समारंभ पाहत होते. त्यावेळी ते भाजपाचे संघटन मंत्री होते आणि पडद्यामागून पक्षाला बळकटी देण्याते काम करत होते. (Photo Source: @modiarchive/X) -
राम रथ यात्रा (१९९०)
गुजरात भाजपाचे सरचिटणीस असताना, मोदींनी अयोध्येला निघालेल्या राम रथयात्रेची जबाबदारी सांभाळली. सोमनाथ-अयोध्या राम रथयात्रा २५ सप्टेंबर १९९० रोजी सुरू झाली. हा फोटो त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक महत्त्वाची झलक आहे. (Photo Source: @modiarchive/X) -
मोदींनी नवनिर्माण चळवळ (१९७४) आणि आणीबाणीसह विद्यार्थी चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला, ज्यात युवा प्रचारक म्हणून काम केले. (Photo Source: @modiarchive/X)
-
आणीबाणीच्या काळात, मोदींनी कधी तपस्वीच्या तर कधी सरदारांच्या वेशात राहून लोकशाहीसाठी लढा दिला, असे सांगितले जाते. त्याच काळातला हा फोटो. (Photo Source: @modiarchive/X)
-
१९९० च्या दशकात परदेश दौरे:
भाजपाचे प्रतिनिधित्व करताना, मोदींनी ४० हून अधिक देशांना भेटी दिल्या होत्या आणि भारतासाठी नवीन गोष्टी शिकून परतले. (Photo Source: @modiarchive/X) -
नरेंद्र मोदी यांनी नेहमीच भारतीय परंपरा आणि वस्त्रोद्योगांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पोशाखातून अनेकदा हे दिसून येते. (Photo Source: @modiarchive/X)
-
आणीबाणीविरोधी चळवळ
मोदींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आणीबाणीविरोधी चळवळींपासून केली. वयाच्या २५ व्या वर्षी मोदी गुजरात लोक संघर्ष समितीचे सरचिटणीस बनले आणि त्यांनी तरुणांचे मोठे संघटन उभे केले. (Photo Source: @modiarchive/X) -
एनसीसी
पंतप्रधान मोदी एनसीसीमध्येही सक्रिय होते. हा फोटो त्याच काळातील आहे. नरेंद्र मोदी बालपणापासूनच शिस्त आणि देशभक्तीला प्राधान्य देत राहिले आहेत, असे या फोटोतून स्पष्ट होते आहे. (Photo Source: @modiarchive/X)
PM Narendra Modi Birthday: बालपण, युवा कार्यकर्ता, सीएम ते पीएम; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २२ दुर्मिळ फोटो…
PM Narendra Modi Birthday, Rare and Unseen photos of PM Narendra Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. पीएम मोदी आज ७५ वर्षांचे झाले आहेत. या ७५ वर्षांमधले त्यांच्या कार्याचे विविध टप्पे व पैलू दाखवणारे काही दुर्मिळ फोटो पाहूयात….
Web Title: Pm narendra modi 75 th birthday look 22 old rare and unseen photos goes viral on social media spl