विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास सात महिन्यांनी दोन मतदारसंघात २५ जुलै ते २ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये ईव्हीएम मशीन्सच्या तपासणी आणि पडताळणीचे कामकाज सुरू करण्यात येणार आहे.
नोव्हेंबर २०२४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक पराभूत विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अनियमिततेचा आरोप केल्यानंतर हडपसर मतदारसंघातील मतदान केंद्रांच्या ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. या निवडणुकीत महायुतीचं सरकार बहुमताने सत्तेत आलं. या निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या विश्वासार्हतेचा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सुमारे सात महिन्यांनंतर आता हे काम सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार प्रशांत जगताप यांनी याबाबत अर्ज केला होता. जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांनी ७,१२२ मतांनी पराभव केला होता.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, विधानसभा निवडणूक २०२४च्या निकालानंतर सात दिवसांच्या आत ईव्हीएम मशीन्सची, कंट्रोलरची तपासणी आणि पडताळणीसाठी उमेदवारांना जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करण्याची तरतूद आहे. पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी ११ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी या कार्यालयाकडे अर्ज दाखल केले होते, त्यापैकी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. उर्वरित सहा उमेदवारांपैकी चार मतदारसंघांमध्ये निवडणूक याचिका दाखल आहे. उर्वरित दोन उमेदवारांच्या अर्जानुसार २५ जुलै २०२५ ते २ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये ईव्हीएम मशीन्सच्या तपासणी आणि पडताळणीचे कामकाज करण्यात येणार असल्याचे पुणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.
२७ ईव्हीएमची तपासणी आणि पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये मॉक पोलदेखील असतील. जिल्ह्यातील भोसरी गोडाऊनमध्ये ही प्रक्रिया केली जाईल. संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मानक कार्यप्रणालीनुसार पार पडेल. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, प्रत्येक ईव्हीएममध्ये एक कंट्रोल युनिट आणि १,४०० मते असलेली व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशीनची तपासणी केल जाईल. २५ जुलै रोजी दोन ईव्हीएमची पडताळणी केली जाईल. त्यानंतर पुढील सहा दिवस दररोज चार मतदान यंत्रांची तपासणी केली जाईल. तर उर्वरित एका मशीनची पडताळणी २ ऑगस्ट रोजी केली जाईल.
कशी होईल पडताळणी?
उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसर यानी सांगितले की, “नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या मतमोजणीच्या वेळी नोंदणीकृत २७ ईव्हीएमचा डेटा उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पडताळला जाईल. डेटा मिटवला जाईल आण मशीनच्या ऑपरेशनची अधिक पडताळणी करण्यासाठी प्रत्येक ईव्हीएमसाठी एक मॉक पोल घेण्यात येईल. यामध्ये एक कंट्रोल युनिट आणि एक व्हीव्हीपॅट असेल.”
प्रशांत जगताप म्हणाले की, “ईव्हीएमची तपासणी आणि पडताळणी केल्याने निवडणूक गैरप्रकार उघडकीस येतील.” त्यांचा दावा होता की हडपसरमध्ये त्यांचा राष्ट्रवादीच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव झाला. निवडणुकीदरम्यान ईव्हीएममध्ये विसंगती असल्याचे सिद्ध झाल्यानंतर ते पुन्हा निवडणूक लढवतील असेही ते म्हणाले.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी (सपा) महाविकास आघाडीचा मित्रपक्ष आहे, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीचा एक प्रमुख घटक पक्ष आहे. असं असताना चेतन तुपे यांनी जगताप यांचे आरोप फेटाळून लावत म्हटले की, “पराभूत उमेदवाराला यातून काहीही साध्य होणार नाही. ईव्हीएम अचूक आहेत हे वारंवार सिद्ध झाले आहे. पराभूत उमेदवाराने ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत, म्हणूनच हा जगताप आणि निवडणूक आयोग यांच्यातील प्रश्न आहे.” “मी निवडून आलो आहे आणि घटनात्मकदृष्ट्या आमदार म्हणून घोषित झालो आहे. मला काळजी करण्याची काहीच गरज नाही. पुन्हा निवडणूक घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”, असेही ते म्हणाले.
मतदान सुरू होण्यापूर्वी प्रत्येक ईव्हीएमची मॉक ड्रिल केले जाते आणि प्रत्यक्ष मतदानात फक्त पडताळणी केलेल्या मशीनचा वापर केला जातो. मतमोजणीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच ईव्हीएमची पडताळणी करण्यात आली होती. यामध्ये मिळालेली मते व्हीव्हीपॅट स्लिपशी जुळवली जातात. दोन्ही वेळा ईव्हीएममध्ये कोणतीही समस्या नव्हती. आताही तसेच होईल. तेव्हा जगताप यांनी त्यांचा पराभव स्वीकारावा”, असे तुपे यांनी म्हटले आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा समावेश असलेल्या विद्यमान महायुतीने विधानसभा निवडणुकीत जोरदार विजय मिळवला. एकूण २८८ पैकी २३५ जागा जिंकल्या; तर महाविकास आघाडीच्या ५० जागांमध्ये काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे. पाच महिन्यांपूर्वी जून २०२४ मध्ये, महायुतीने राज्यातील लोकसभा निवडणुकीत एकूण ४८ पैकी ३० जागा जिंकल्या होत्या, तर महायुतीने १७ जागा जिंकल्या होत्या.
महत्त्वाचे मुद्दे:
- पराभूत उमेदवार प्रशांत जगताप यांनी निवडणूक निकालावर आक्षेप घेत याचिका दाखल केली
- सत्ताधारी विरोधी पक्षांनी मतदान यंत्रांबाबत संशय व्यक्त केला
- मतमोजणी प्रक्रियेत गडबड झाल्याचा आरोप केला
- कोर्टाने संबंधित याचिकेच्या सुनावणीदरम्यान ईव्हीएम व व्हीव्हीपॅट (VVPAT) पडताळणी करण्याचे निर्देश दिले
- ईव्हीएममधील मते आणि व्हीव्हीपॅटच्या स्लिप्समधील माहिती जुळते का, याची तपासणी केली जाणार आहे
- ही पडताळणी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित आहे
विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी आरोप केला की, ईव्हीएममध्ये फेरफार आणि गैरप्रकारांमुळे त्यांचा पराभव झाला. त्यांच्या काही पराभूत उमेदवारांनी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांसमोरही याला आव्हान दिले.
पुणे प्रशासनाच्या २५ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या मतदानात जिल्ह्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघाचाही समावेश असेल. खडकवासला येथील राष्ट्रवादी (शरद पवार)चे पराभूत उमेदवार सचिन दोडके यांनी फक्त दोन ईव्हीएमची तपासणी आणि पडताळणी करण्याची मागणी केली आहे. भाजपाचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी त्यांचा ५२,००० मतांनी पराभव केला. तापकीर यांनी सलग चौथ्यांदा ही जागा जिंकली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवाराविरुद्ध १३,००० पेक्षा जास्त मतांनी निवडणूक जिंकली असूनही ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला. विधानसभा निवडणुकीच्या निकालांची पडताळणी करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातील मार्कडवाडी गावातील लोकांनी प्रस्तावित केलेल्या मतपत्रिकांसह केलेल्या मॉक पोलला त्यांनी पाठिंबा दर्शविला. असं असताना गेल्या वर्षी ३ डिसेंबर रोजी मार्कडवाडी ग्रामस्थांनी प्रस्तावित मतपत्रिका चाचणी जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचा हवाला देत कारवाईचा इशारा दिल्यानंतर रद्द करण्यात आली. “आम्ही हा मुद्दा निवडणूक आयोग आणि न्यायपालिकेसमोर उपस्थित करू. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही,” असे जानकर यांनी त्यावेळी म्हटले होते.