राज्यातील उसाचा गळीत हंगाम सुरू होऊन एक महिना झाला आहे. तरीही अद्याप १३८ कारखानेच सुरू झाले आहेत. अजून सुमारे साठ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणे बाकी आहे. मागील हंगामात दोनशे कारखाने सुरू होते.साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात ६८ सहकारी आणि ७० खासगी, असे एकूण १३८ कारखाने सुरू झाले आहेत. मागील वर्षात याच वेळी राज्यात १५० कारखाने सुरू होते. यंदा कोल्हापूर विभागात ३२, पुणे विभागात २४, सोलापूर विभागात ३७, अहमदनगर विभागात १५, औरंगाबाद विभागात ११, नांदेड विभागात १६, अमरावती विभागात दोन तर नागपूर विभागात केवळ एकच कारखाना सुरू झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदर्भात धुराडी पेटलीच नाहीत
मागील हंगामात वर्धा, भंडारामध्ये प्रत्येकी एक आणि यवतमाळ आणि नागपुरात प्रत्येकी दोन, असे एकूण सहा कारखाने सुरू होते. पण, यंदा आजअखेर अमरावती विभागात दोन आणि नागपूर विभागात एक, असे तीन कारखाने सुरू झाले आहेत. मागील हंगामात सर्वात कमी साखर उत्पादन करणाऱ्या दहा कारखान्यांमध्ये विदर्भातील चार कारखान्यांचा समावेश होता. त्यात नागपूरमधील मानस ॲग्रो इंडस्ट्रीज, युनिट एक बेला (ता. उमरेड), आणि व्यंकटेश्वरा (मौदा), वर्धामधील मानस ॲग्रो इंडस्ट्रीज, युनिट तीन, भंडाऱ्यातील मानस ॲग्रो इंडस्ट्रीज, युनिट- चार या चार साखर कारखान्यांचा समावेश आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड: कोयत्यासह रिल्स बनवून इंस्टाग्रामवर स्टेट्स ठेवण पडलं महागात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विदर्भातील जमीन-पाणी ऊस उत्पादनासाठी पोषक आहे. मात्र, दुर्दैवाने तेथील राजकीय नेत्यांनी साखर उद्योगाकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. चांगले नेतृत्व न मिळाल्यामुळेच विदर्भात साखर उद्योगाचा विकास होऊ शकला नाही. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील सुधाकरराव नाईक कारखाना आम्ही चांगला चालवून दाखविला आहे. – बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A month after sugarcane fall season started sixties factories are still closed pune print news tmb 01