पुणे : मध्य रेल्वेने छटपूजेनिमित्त उद्या (३० ऑक्टोबर) उत्तर आणि दक्षिण भारताकडे जाण्यासाठी २५ विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.
पुणे ते गोरखपूर ही गाडी सकाळी ६.५० वाजता दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, भुसावळ, खंडवा, भोपाळ, झाशी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा बस्ती अशी जाणार आहे. अन्य विशेष गाड्या एकाच दिवशी धावणार असून, प्रत्येक गाडीचा मार्ग वेगळा असेल. प्रवाशांना ऑनलाईन तिकीट सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी सांगितले.
जादा गाड्यांचे वेळापत्रक
ठिकाण – वेळ
– पुणे ते संगानेर – सकाळी ९.४५
– पुणे ते दानापूर – दुपारी ३.३०
– पुणे ते हजरत निझामुद्दीन – संध्याकाळी ५.३०
– पुणे ते नागपूर – रात्री ८.३०
– हडपसर ते दानापूर – सकाळी ८.३०
– हडपसर ते वीरांगना लक्ष्मीबाई झांसी – दुपारी ३.३०
– हडपसर ते गाझीपूर – दुपारी ४.००
– दौंड-कलबुर्गी – पहाटे ५.००
– कोल्हापूर-कलबुर्गी – सकाळी ६.१०
– कलबुर्गी ते कोल्हापूर – संध्याकाळी ६.१०
– कलबुर्गी ते दौंड – रात्री ८.३०
