पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी अजित पवार राजभवन येथे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतानाचा देखावा साकारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यास देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत असतात. या गणेशोत्सवामध्ये अनेक मंडळ सामाजिक आणि चालू घडामोडी बाबत देखावे सादर करून नागरिकांमध्ये प्रबोधन करण्याचे काम करीत असतात. हे सर्व भाविकांचे प्रामुख्याने आकर्षण असते. बाबासाहेब पाटील यांनी साकारलेला देखावाही आकर्षण ठरत आहे.

हेही वाचा – पुणे : रोहित पवारांचे पुणे-मुंबई महामार्गावर भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले…

राज्यातील सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा आजवर बोलवून दाखविली. या पदावर जाण्यात काहींना यश आले. तर काही अद्यापही मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यापैकी एक म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच नाव समोर येत. राज्यातील अनेक भागांतील कार्यकर्ते अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री अशा आशयाचा फ्लेक्स लावत असल्याचे पाहत आलो आहोत. तर त्याच पार्श्वभूमीवर यंदा पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी अजित पवार राजभवन येथे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतानाचा देखावा साकारला आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, नितीन गडकरी, रामदास आठवले, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमीर खान, रजनीकांत, नाना पाटेकर, अशोक सराफ यांच्यासह अनेक मंडळी शपथविधी सोहोळ्याच्या देखाव्यात दाखविण्यात आली आहेत.

छायाचित्र – लोकसत्ता टीम

हेही वाचा – आठवड्यातून एक दिवस ‘दप्तराविना शाळा’; पिंपरी महापालिकेच्या शाळांमधील उपक्रम

या देखाव्याबाबत बाबासाहेब पाटील म्हणाले की, राज्याच पुढील ५० वर्षांचे व्हीजन असणारे व्यक्तिमत्व म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार. पुणे, पिंपरी चिंचवड, बारामतीमधील विकास काम पाहून लक्षात ते येते. त्यामुळे माझ्यासह राज्यातील कार्यकर्त्यांची एकच भावना आहे, ती म्हणजे अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावे. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाचा देखावा साकारला असून गणरायाकडे एकच प्रार्थना आहे, ती म्हणजे दादांना मुख्यमंत्री करावे आणि गणराया आमची प्रार्थना ऐकतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decoration of ajit pawar taking oath as cm made in pune svk 88 ssb