पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्व १२८ शाळांमध्ये दर शनिवारी ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम सुरू केला आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या खांद्यावरचा भार हलका झाला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये आता गीत, कविता, गायन, प्रश्नमंजूषा, शाब्दिक खेळ, पाककला, चित्रकला, मैदानी खेळ असे विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला, तसेच पर्यावरणपूरकतेला प्रोत्साहन मिळत आहे.

विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिल्यास त्यांची शाळा उपस्थितीची गोडी वाढेल आणि आठवड्याभराच्या शारीरिक, मानसिक त्रासातून मुक्तता मिळेल, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘दप्तराविना शाळा’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची कल्पकता तर वाढलीच आहे; पण त्यांच्या कौशल्यालाही वाव मिळाला आहे. पालक आणि शिक्षकांनीही या अग्रेसर विचारसरणीचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : पुणे : रोहित पवारांचे पुणे-मुंबई महामार्गावर भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या उपक्रमाने विद्यार्थ्यांना जड दप्तरांच्या शारीरिक ओझ्यापासून मुक्ती तर दिलीच. पण त्यांचा मानसिक भारही हलका केला आहे. जिज्ञासा आणि जीवनकौशल्ये यावर भर देऊन महापालिका शाळा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शाळेच्या वेशीपलीकडे सतत विकसित होत असलेल्या धावपळीच्या जगात पाऊल ठेवण्यास मदत करतील, असे शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी सांगितले.