पुणे : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांच्याशी मुख्यमंत्री बोलत आहेत. याप्रकरणी शासकीय अध्यादेश देखील काढला. पण, त्यांना तो मान्य नाही. सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारने निर्णय घेतला तरी शेवटी मनोज जरांगे यांना निर्णय पटला पाहिजे. आम्ही त्यांना समजवण्यात कमी पडतोय, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले. मराठा आरक्षणाबाबत शुक्रवारी रात्री बैठक झाली. आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळ मुंबईला गेले होते. रात्री साडेदहा वाजता सह्याद्रीवर शिष्टमंडळाने सरकारसोबत चर्चा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुण्यातील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दिशेने पाऊल…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीत उपस्थित होते. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, रात्री उशिरापर्यंत बैठक सुरु होती. मला जास्त काही माहिती घेता आली नाही. मनोज जरांगे यांच्याशी मुख्यमंत्री बोलत आहेत. याप्रकरणी शासकीय अध्यादेश देखील काढला. पण, त्यांना तो मान्य नाही. सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारने निर्णय घेतला तरी शेवटी मनोज जरांगे यांना निर्णय पटला पाहिजे. आम्ही त्यांना समजवण्यात कमी पडतोय. त्यामुळे सरकारने आज शिष्टमंडळ पाठवले आहे. कायद्याच्या अंतर्गत निर्णय घेण्याचा सरकार प्रयत्न करत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy cm ajit pawar on manoj jarange patil hunger strike for maratha reservation vvk 10 css