पिंपरी – चिंचवड : पिंपरी- चिंचवडमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून २६ वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. दिव्या हर्षल सूर्यवंशी, आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीच नाव आहे.

दिव्याचा तीन वर्षांपूर्वी हर्षल सोबत मोठ्या थाटात विवाह संपन्न झाला होता. काही वर्षे होत नाहीत, की त्यांच्या खटके उडायला सुरुवात झाली. पती आणि पत्नीमध्ये वाद होत होते. अशी माहिती वाकड पोलीसांनी दिली आहे. हर्षल हा उच्च शिक्षित असून नामांकित कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. हर्षल हा सतत माहेराहून पैसे आणण्यासाठी दिव्यावर दबाव टाकत होता. शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. अखेर या जाचाला कंटाळून दिव्याने सोमवारी रात्री बेडरूमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

शवविच्छेदन अहवालात देखील दिव्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. दिव्याच्या नातेवाईकांनी दिव्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला. तसा आरोप दिव्याच्या सासरच्या मंडळीवर करण्यात आला आहे. वाकड पोलीसांनी या प्रकरणी दिव्याचा पती आरोपी हर्षल सूर्यवंशी आणि सासरे शांताराम सूर्यवंशी ला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात आणखी काही जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.