पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आहेत. तसेच नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. त्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा: ‘शिवाजी जुन्या काळातले आदर्श, मी नव्या…”, Bhagat Singh Koshyari यांचे वक्तव्य चर्चेत!

त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप काळे यांनी शहरातील विविध ठिकाणी बॅनर लावून त्या विधानाचा निषेध नोंदविला आहे. आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श होते, आहेत आणि राहणारच……उतरत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच धोतर फाडणार्‍यास किंवा फेडणार्‍यास १ लाख रोख रक्कम दिली जाईल अशी टीप या फ्लेक्सवर लिहिण्यात आली. या बॅनरची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी संदीप काळे यांना या फ्लेक्सबाजी बाबत लोकसत्ता ऑनलाइनच्या प्रतिनिधीने संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governor bhagat singh koshyari controversial statement shivaji banner fight by ncp pune tmb 01 svk