पिंपरी: मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी कुठल्याच नेत्याला आम्ही ध्वजारोहण करू देणार नाही. असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. जर त्या दिवशी ध्वजारोहण करण्यासाठी नेते आले तर त्यांना होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे लागेल. त्यांच्या गाड्या फुटतील किंवा जाळल्या जातील. मराठा समाज काय करेल हे सांगता येणार नाही असं भडकावू विधान त्यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जावळे पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका अखिल भारतीय छावा संघटनेची आहे. गेली अनेक वर्ष झालं छावा संघटना या संदर्भात लढा देत आहे. अनेक सरकार आले आणि गेले. परंतु, मराठा समाजाला आरक्षण अद्यापही मिळाल नाही. त्यामुळे मराठा समाजाचा संयम सुटत आहे. महाराष्ट्रात अनेक आंदोलन मराठा समाज शांततेच्या मार्गाने करत आहेत. तरीही हे सरकार कुठल्या निर्णयापर्यंत पोहचत नाही. म्हणून छावा संघटनेने ठरवलेलं आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी कुठल्याही नेत्याला ध्वजारोहण करू देणार नाही. मराठा आरक्षणाबद्दल आपण निर्णय घेतला नाही तर तुम्ही ध्वजारोहणासाठी येऊ नये. जर आला तर होणाऱ्या परिणामाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. तुमच्या गाड्या फुटतील किंवा जाळल्या जातील. मराठा समाज काय करेल हे सांगता येणार नाही. असा इशारा त्यांनी दिला आहे.

आणखी वाचा-पुणे : “लवकर उठून कार्यक्रमाला वेळेवर जायला शिका”, अजित पवारांचा पालकमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला

पुढे ते म्हणाले, मराठा समाजाने सर्व धर्मातील नेत्यांवर प्रेम केलेलं आहे. पण मराठा समाजावर वेळ आली, हक्कासाठी झगडतोय. मराठा नेत्यांना आगामी निवडणुकांमध्ये मतदान देणार नाहीत. घरात घुसून त्यांना मारल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही. केवळ राजकारणी म्हणून मराठ्यांची मतं पाहिजेत. सर्वच मराठा नेते मराठा समाजाचा वापर करून घेत आहेत. अस त्यांनी म्हटलं आहे. पण मराठा समाजासाठी काही करायचं नाही. हे मराठा नेत्यांचे धोरण आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल म्हणून त्यांचे नेते एकत्र येतात. मात्र, मराठा नेता पुढे येत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा असून त्यांच्याकडून मराठा आरक्षणाविषयी आम्हाला अपेक्षा आहे. अस देखील त्यांनी म्हटलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If maratha community does not get reservation we will not allow the leaders to hoist the flag chhava organization warned kjp 91 mrj