पुणे : ‘लवकर वेळेवर उठायला शिका आणि कार्यक्रमाला वेळेत जायला शिका’, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना दिला असला तरी या विधानांतून त्यांनी उशिरा येणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावल्याची चर्चा शनिवारी रंगली. ‘दादा बोलले त्याला मी फक्त मम म्हटले तरी पुरेसे ठरे”, अशी सारवासारव करीत पाटील यांनी वेळ मारुन नेली. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमासाठी शनिवारी अजित पवार वेळेत पाेहचले. परंतु पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पोहोचण्यास अशीर झाला. त्यामुळे अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत, आपल्या भाषणात उपदेशाचे सल्ले दिले.

पवार यांचे भाषण सुरू असतानाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे व्यासपीठावर आगमन झाले आणि विद्यार्थ्यांना सल्ला देण्याच्या भूमिकेतून अजितदादांनी पालकमंत्र्यांना चिमटा काढला. पवार म्हणाले, राजकारण करताना माझाही शिक्षण संस्थाशी संबंध येत असून संस्थांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. राज्य शासन शिक्षणावर ८० हजार कोटी रुपये खर्च करते. ज्ञान संपादन करणे महत्त्वाचे असून शिक्षकांचे यश हे त्यांच्या कामगिरीवर अवलंबून असते. पुणे जिल्हयातील मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यात शिक्षकांची संख्या कमी असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यावर होत आहे.

thane lok sabha seat, BJP s Sanjeev Naik, Launches Campaign in Thane, Emphasizes Charitable Birthday Celebration, sanjeev naik in thane lok sabha, mahayuti, shinde shivsena,
वाढदिवसाच्या निमित्ताने संजीव नाईक यांची मतपेरणी
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
If you want to talk negatively leave gathering says Minister Chandrakant Patil
नकारात्मक बोलायचे असेल तर मेळाव्यातून बाहेर जा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

हेही वाचा : जरांगे यांना समजवण्यात आम्ही कमी पडतोय…

पाचवीचे शिष्यवृत्ती निकाल लागलेला असून या परिक्षेत ६४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रत्येक तालुक्यातील निकाल वेगवेगळे आहे. माझी शिक्षकांना विनंती आहे की, तुमच्या काही अडचणी असतील तर सांगा, मी त्या अडचणी सोडवतो. परंतु विद्यार्थी चांगल्याप्रकारे घडविण्याचे काम करा. शिरूर तालुक्यात चांगल्याप्रकारे निकाल लागतो. परंतु, दौंड, हवेलीत निकाल चांगला लागत नाही तो शून्य टक्के लागतो हे योग्य नाही. पवार म्हणाले, राज्यातील मराठी माध्यमाच्या काही शाळा या इंग्रजी माध्यमात परिवर्तित कराव्या लागणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलणे झाले आहे. ३० हजार शिक्षकांची भरती करत असताना त्यात इंग्रजी माध्यमासाठीच्या शिक्षकांची देखील भरती केली जाणार आहे. यातून वेगळा अर्थ काढायचे कारण नाही. इंग्रजी माध्यमाकडील ओढा आणि गरज लक्षात घेता हा निर्णय घेणार आहोत.

हेही वाचा : झटपट पैसे कमाविण्यासाठी वायरमनकडून दुचाकी चोरीचे गुन्हे, पाच दुचाकी जप्त

मराठी माध्यमाच्या शाळांना कमी लेखणे किंवा त्यांचं महत्व कमी करणे हा उद्देश नाही. इंग्रजी ही ज्ञानाची आणि जागतिक संवादाची भाषा आहे. मराठीला कमी लेखण्याचा हेतू नाही. शिक्षणात गुणवत्तेला महत्त्व आहे. खऱ्या गुणवंतांनाच पुरस्कार मिळतात. चारित्र्यसंपन्न पिढी घडवणं हे शिक्षणाचं काम आहे. त्यासोबत नैतिक मूल्ये जपली गेली पाहिजे. करिअर निवडताना मळलेल्या वाटावर जाऊ नका. त्याऐवजी नवनवीन मार्ग निवडा. मळलेल्या वाटेवर जाण्यापेक्षा नवीन वाट स्वीकारली तर संधी आणि यशाची शक्यता वाढते. यासोबत चांगले छंद जोपासा. व्यसन करू नका. शरीर तंदुरुस्त ठेवा. ढेरी, पोट सुटू देऊ नका.

हेही वाचा : पुण्यातील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दिशेने पाऊल…

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिलीच्या आधीची तीन वर्षे महत्वाची मानली आहेत. मातृभाषेतून शिक्षण, परंपरांचा अभिमान, संस्कार आणि रोजगाराभिमुख शिक्षण हा नवीन शैक्षणिक धोरणाचा पाया असणार आहे. खूप काम करणारी माणसे जगाला हवी आहेत. ती निर्माण करण्याचे काम विद्यार्थी घडविण्यातून व्हावे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.