Premium

‘मुळशी पॅटर्न’ चर्चेत! शेत जमिनीच्या वादातून मध्यप्रदेशातून आणली चार पिस्तुले

पोलिसांनी चार जणांकडून चार पिस्तुल व दहा काडतुसे जप्त केली आहेत.

pimpri man ordered 4 pistols, 4 pistols ordered from madhya pradesh in pimpri
'मुळशी पॅटर्न' चर्चेत! शेत जमिनीच्या वादातून मध्यप्रदेशातून आणली चार पिस्तुले (संग्रहित छायाचित्र)

पिंपरी : शेत जमिनीला आलेला भाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वादातून धुमसत असलेला ‘मुळशी पॅटर्न’ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मुळशी तालुक्यातील उरावडे-आंबेगाव येथील शेत जमिनीच्या हक्कावरुन सुरू असलेल्या भांडणातून एकाने स्वसंरक्षणासाठी थेट साथीदारासह मध्यप्रदेशात जाऊन चार पिस्तुल आणि दहा काडतुसे आणली. त्यातील दोन पिस्तुले त्याने मित्र आणि नातेवाईकाला दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने चारही जणांच्या मुसक्या आवळल्या. हरीष काका भिंगारे (वय ३४, रा. आंबेडकरनगर, औंध रोड, मूळ – उरावडे, ता. मुळशी), गणेश बाळासाहेब कोतवाल (वय ३०, रा. समर्थनगर, नवी सांगवी), शुभम जगन्नाथ पोखरकर (वय ३०, रा. पाषाण) आणि अरविंद अशोक कांबळे (वय ४२, रा. पौड, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

हेही वाचा : मावळमध्ये शिंदे गटाचे खासदार आणि अजितदादा गटाच्या आमदारामध्ये जुंपली

सांगवी परिसरात गस्त घालत असताना युनिट दोनचे सहायक फौजदार शिवानंद स्वामी यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती पीडब्ल्यूडी मैदानाजवळ आला असून त्याच्याकडे पिस्तुल आहे. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून हरिष व गणेश यांना ताब्यात घेतले. दोघांच्या अंगझडतीमध्ये कमरेला लावलेली दोन पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे आढळली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सहा-सात महिन्यांपूर्वी मध्यप्रदेश येथे जाऊन चार पिस्तुल खरेदी करुन आणल्याचे व दोन पिस्तुल पाषाण येथील मित्र शुभम व पौड येथील नातेवाईक अरविंद यांना दिल्याचे सांगितले.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील भूमिपुत्रांचा लढा; महायुतीच्या आमदारांचा पाठिंबा

त्यानुसार, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे जप्त केली. पोलिसांनी चार जणांकडून चार पिस्तुल व दहा काडतुसे जप्त केली आहेत. आरोपी हरीष भिंगारे हा मूळचा मुळशी तालुक्यातील उरावडे-आंबेगाव येथील रहिवाशी असून त्याचा तेथील स्थानिक व्यक्तीशी शेत जमीनीच्या हक्कावरुन वाद आहे. त्याबाबत त्यांच्यात भांडण झाले होते. त्यामुळे मनात भीती असल्याने हरिषने स्वसंरक्षणासाठी पिस्तुल घेण्याचे ठरविले. हरीष व गणेश हे दोघे मित्र असून त्यांनी मध्यप्रदेशच्या सिमाभागात जाऊन चार पिस्तुल व काडतुसे खरेदी करुन आणले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pimpri man ordered 4 pistols from madhya pradesh due to land disputes mulshi pattern in discussion pune print news ggy 03 css

First published on: 05-12-2023 at 13:38 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा