पुणे : भारतीय जनता पक्षासाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात खासदार गिरीश बापट सक्रिय झाले आहेत. खासदार बापट यांच्या उपस्थितीत कसब्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा केसरीवाड्यात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच बापट जाहीरपणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याने या मेळाव्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांची भेट घेतल्यानंतर चोवीस तासांतच बापट यांच्या उपस्थितीत मेळावा होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “काँग्रेस, राष्ट्रवादीला मत म्हणजे विकास थांबवणे”, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल; म्हणाले, “दोन्ही पक्षांनी..”

हेही वाचा – पुणे : कामगार विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच, महिलेसह दोघांना पकडले

आमदार म्हणून गिरीश बापट यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाचे तब्बल तीस वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या ते पुण्याचे खासदार असून प्रकृतीच्या कारणास्तव पोटनिवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाले नव्हते. तसे प्रसिद्धी पत्रकही बापट यांनी जाहीर केले होते. बापट यांचे प्रचारातील महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाश शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांची भेट घेतली होती. निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने बापट यांनी काही महत्वाच्या सूचना केल्याचे आणि बापट कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या कामाला लागल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानंतर बापट यांच्या उपस्थितीत केसरीवाड्यात गुरुवारी मेळावा होत आहे. त्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp girish bapat active in campaign workers meet in kesariwada pune print news apk 13 ssb