Pune Breaking News Updates, 08 August 2025 : पुणे जिल्ह्यात चाकण, हिंजवडी आणि उरळी देवाची-फुरसुंगी-मांजरी अशा तीन महापालिका केल्या जाणार आहेत, अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी केली. उपमुख्यमंत्री पवार शुक्रवारी सकाळी चाकण औद्योगिक क्षेत्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील नागरी समस्यांची पाहणी केली.

पुण्यातील वाढत्या शहरीकरणाबरोबरच हवेची गुणवत्ताही खालावत चालली आहे. शहरात दिवसेंदिवस वाढणारी बांधकामे आणि औद्योगिक कचऱ्यामुळे होणारे वायू प्रदूषण यामुळे खराब हवेचे दिवस वाढल्याची बाब महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून नुकतीच समोर आली होती. या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रदूषणाचा फुफ्फुसांवर होत असलेल्या गंभीर परिणामांबाबत आरोग्यतज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या शहरांतील व जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी जाणून घ्या या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून…

Live Updates

Mumbai Pune Nagpur Latest News Updates in Marathi

12:44 (IST) 8 Aug 2025

भुसावळ-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत; राजधानी, दुरांतोसह अनेक गाड्यांचा खोळंबा

रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा डबा घसरल्याने मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

सविस्तर वाचा…

12:44 (IST) 8 Aug 2025

आपत्ती बाधितांना ३६८ कोटी रुपयांची मदत, जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा

अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सविस्तर वाचा…

12:43 (IST) 8 Aug 2025

गुजरात, राजस्थानमधून सायबर लुटारूंची आंतरराज्यीय टोळी जेरंबद

विशेष म्हणजे तक्रारीनंतर अवघ्या एकवीस दिवसांत पोलिसांनी या सायबर लुटारूंना हुडकून काढले आहे. …वाचा सविस्तर
12:43 (IST) 8 Aug 2025

धान्यावर आधारित ‘राज्य निर्मित मद्य’ प्रकारला मंजुरी, बंद पडू लागलेल्या १६ मद्य उद्योगांना होणार लाभ

राज्यात विदेशी मद्य उत्पादनाचे ४८ उद्योग कार्यरत आहेत. त्यामध्ये ७ विदेशी कंपन्या असून राज्यातील विदेशी मद्य निर्माणामध्ये त्यांचा ९० टक्के वाटा आहे.

सविस्तर वाचा…

12:42 (IST) 8 Aug 2025

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी ‘संकटमोचक’, गिरीश महाजन डेहराडूनमध्ये दाखल

उत्तराखंडमध्ये राज्यातील पर्यटक अडकल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्य आपत्ती कक्षातून उत्तराखंडमधील पर्यटकांबाबत आढावा घेतला.

सविस्तर वाचा…

12:42 (IST) 8 Aug 2025

दर पाचवा भारतीय रक्तदाबाच्या विळख्यात! ‘हाय ब्लड प्रेशर’चा सायलेंट स्फोट, आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान…

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) २०२४ च्या एका सर्वेक्षणानुसार देशात सध्या सुमारे ३५ कोटी लोक उच्च रक्तदाबाच्या छायेत आहेत.

सविस्तर वाचा…

12:39 (IST) 8 Aug 2025

नवी मुंबई पोलीस दलात चाललंय तरी काय… महिन्याभरात ५ पोलीसांचा विविध कारणांमुळे मृत्यू

महिन्याभरात नवी मुंबई पोलीस दलातील विविध पोलीस ठाणे आणि शाखांमध्ये काम करणा-या पाच कर्मचा-यांचा विविध आरोग्याच्या कारणांमुळे मृत्यू झाल्याच्या घटनांमुळे नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी हादरून गेले आहेत. …वाचा सविस्तर
12:39 (IST) 8 Aug 2025

पनवेल : कळंबोलीत १५ वर्षानंतर लोखंड बाजारातील रस्त्याला मोकळा श्वास

कळंबोली येथील लोखंड बाजारातील शितल हॉटेल चौक ते फुडलॅण्ड चौकापर्यंतच्या सेवा रस्त्यावर रोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. …सविस्तर बातमी
12:37 (IST) 8 Aug 2025

खंडणी प्रकरणी ५ पोलीस कर्मचारी निलंबित; पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची कडक कारवाई

चिखली शहरात वाहतूक पोलिसांकडून परराज्यातील वाहनचालककडून जबरदस्तीने पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. …सविस्तर बातमी
12:28 (IST) 8 Aug 2025

यावर्षी करंजा बंदरात ६०० कोटींच्या मासळी बाजार….. वाढत्या निर्यातीमुळे करंजा बंदर ठरणार देशातील मासळी निर्यातीच नवे केंद्र

मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाली असून करंजा बंदरातील मासळी बाजाराला सुरुवात झाली आहे. या बाजारात गतवर्षी ५०० तर यावर्षी ६०० कोटींच्या मासळीची विक्रमी उलाढाल होण्याची अपेक्षा मच्छिमारांनी व्यक्त केली आहे. …वाचा सविस्तर
12:27 (IST) 8 Aug 2025

पीएमपीच्या जागांवर मॉल, रुग्णालयाची उभारणी?

‘पीएमपी’ प्रशासनाची आर्थिक तूट वाढत आहे, तर दुसरीकडे अद्ययावत सुविधा असलेल्या इलेक्ट्रिक, सीएनजी आधारित वातानुकुलित बस ताफ्यात दाखल होत आहेत. …सविस्तर वाचा
11:49 (IST) 8 Aug 2025

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदवार्ता; शेगावला मिळाला वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा

वंदे भारत रेल्वे सुरु करण्यासंदर्भात व शेगावला थांबा मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. …सविस्तर वाचा
11:33 (IST) 8 Aug 2025

एमपीएससीतर्फे बहुप्रतीक्षित निकाल जाहीर… शिफारसपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध

प्राथमिक शिक्षकांच्या पात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल न्यायिक प्रकरणे निकाली निघाल्यानंतर त्या अनुषंगाने पारित आदेशानुसार उर्वरित ५३ पदांचा निकाल जाहीर करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

11:32 (IST) 8 Aug 2025

सावधान! पुण्यातील वाढत्या प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका!

प्रदूषणामुळे दमा, गंभीर श्वसनविकार (सीओपीडी), फुफ्फुसांचा कर्करोग यासारख्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात.

सविस्तर वाचा…

11:31 (IST) 8 Aug 2025

आयटी पार्कचा चेंडू पुन्हा अजित पवारांच्या कोर्टात! हिंजवडीसह माण ग्रामपंचायतीचा विरोध; आज फैसला होणार

हिंजवडी, माण, मारुंजी भागातील प्रस्तावित रस्त्यांच्या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान बाधित शेतकऱ्यांना विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) मोबदला स्वरूपात देणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 8 Aug 2025

New Municipal Corporations in Pune: पुणे जिल्ह्यात हिंजवडी, चाकणसह होणार तीन नवीन महापालिका! उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यापासून दर आठवड्याला आयटी पार्क आणि चाकण औद्योगिक क्षेत्राची पाहणी सुरू केली आहे.

सविस्तर वाचा…

मुंबई पुणे नागपूर न्यूज ८ ऑगस्ट २०२५