पुणे : ढोलताशा पथके, ध्वनिवर्धकांच्या भिंती यांचा यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत किती दणदणाट होणार असा प्रश्न आहे. गेल्यावर्षीच्या मिरवणुकीत १०५.२ डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली होती. तर २००१ ते २०२२ या काळात २०१३ मधील १०९.३ डेसिबल ही ध्वनिपातळी सर्वाधिक आहे. लक्ष्मी रस्त्यासह शहरातील प्रमुख रस्त्यांवरील गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी सजावट आणि रोषणाई केलेले रथ, ढोलताशा पथके, सामाजिक संदेश देणारी पथके, ध्वनिवर्धकांच्या भिंती लावण्यात आल्या आहेत. त्याशिवाय पोलिसांकडूनही विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी कडेकोट बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी ढोलताशा पथकांच्या सरावामुळे होणाऱ्या दणदणाटाची बरीच चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर आता प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीत किती दणदणाट होणार असा प्रश्न आहे. सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाकडून विसर्जन मिरवणूक मार्गावर विविध ठिकाणी ध्वनिपातळीच्या नोंदी घेतल्या जातात. २००१पासूनच्या आकडेवारीनुसार २०१३ मध्ये सर्वाधिक १०९.३ डेसिबल, त्या खालोखाल गेल्यावर्षी १०५.२ डेसिबल, २०१२मध्ये १०४.२ डेसिबल, २००७मध्ये १०.२ डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली आहे. तर करोना काळात विसर्जन मिरवणूक न झालेल्या २०२० आणि २०२१ या वर्षी ५९.८ डेसिबल ध्वनिपातळीची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर यंदाच्या मिरवणुकीत दणदणाटाची किती ध्वनिपातळी नोंदवली जाणार हा प्रश्न आहे.

हेही वाचा : पुणे : विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ; आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात

गणेश मंडळे, ढोलताशा पथके नियमांचे पालन करणार का?

विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ढोलपथकांसाठी पोलिसांनी नियमावली केली आहे. ५० ढोल तसेच १५ ताशावादकांचे सादरीकरण करण्यात येईल. बेलबाग चौक, सेवासदन चौक (लिंबराज महाराज चौक), टिळक चौकात ढोलपथकांना सादरीकरणासाठी दहा मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रमुख मंडळांसह अन्य मंडळांच्या मिरवणुकीत दोन ते तीन पथके सहभागी होणार आहे. मात्र पोलिसांच्या नियमावलीचे पालन गणेश मंडळे आणि ढोलताशा पथकांकडून केले जाणार का, हा प्रश्न आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune ganesh visarjan 2023 started 105 2 decibel sound recorded last year pune print news ccp 14 css