पिंपरी : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचारादरम्यान ‘हू इज धंगेकर’ म्हणत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांना हिणवले होते. भाजपचा कसब्याचा गड हिसकावून घेतल्यानंतर ‘मी आहे धंगेकर’ असे प्रत्युत्तर नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिले. त्याबाबत पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री पाटील यांना विचारले असता ‘ठीक आहे: म्हणत त्यांनी बोलणे टाळले.
हेही वाचा >>> चोरमंडळ’ विधानावर संजय राऊतांचं पुन्हा स्पष्टीकरण; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले, “माझ्या विधानाबाबत…”
कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष्य लागले होते. कसबा हा भाजपचा गड मानला जात होता. हा मतदारसंघ सलग २८ वर्षे भाजपकडे होता. विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी सलग २५ वर्षे तर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांनी तीनवर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. केंद्रीय ते राज्य पातळीवरील नेते प्रचारात उतरले होते.
हेही वाचा >>> चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांची घेतली भेट
प्रचारादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीकडून लढत असलेले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याबाबत बोलताना ‘हू इज धंगेकर’ असे विधान केले होते. याच धंगेकर यांनी भाजपचा २८ वर्षांचा गड उद्धवस्त केला. त्यानंतर मी आहे धंगेकर असे प्रत्युत्तर नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिले होते. त्यावर आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना तुम्ही म्हणालात हू इज धंगेकर, कसब्याचे आमदार म्हणाले की मी आहे रवी धंगेकर असे विचारले असता पालकमंत्री पाटील हो, ठीक ठीक चला असे म्हणत त्यांनी बोलणे टाळले.